पंचवटी : पाच वर्षांपूर्वी जडलेल्या अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसी, तिची मुलगी आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलेला आहे. Panchavati Immoral Relations Man Burnt lover ten month baby died
पेठरोड वरील फुलेनगर भागात मायको दवाखान्याजवळ आज पहाटे 4 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. संगीता देवरे यांचे गेल्या पाच वर्षांपासून मथुरा येथे राहणाऱ्या जलाउद्दीन खान याच्याशी अनैतिक संबंध होते. #NashikOnWeb
या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वादीवाद सुरू होते. यादरम्यान आज रात्रीच्या सुमारास पुन्हा बाचाबाची झाली होती. संगीता देवरे यांची मुलगी प्रीती शेंडगे, नात सिद्धी शेंडगे हे गाढ झोपेत असतांना संशयित जलाउद्दीन खान याने गादीवर रॉकेल टाकून तिघींना पेटवून दिले आहे.
पहाटे घडलेल्या या घटनेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचार सुरू असताना 9 महिन्याच्या सिद्धी शेंडगे या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर संगीता आणि प्रीती शेंडगे यांच्यावर जळीतकक्षामध्ये उपचार सुरु आहेत. Panchavati Immoral Relations Man Burnt lover ten month baby died
या घटनेनंतर प्रियकर आरोपी जलाउद्दीन खान हा फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांनी सांगितले.
हा धक्कादायक प्रकार असून एकूणच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.