ylliX - Online Advertising Network

अनैतिक संबंधातून जळीतकांड मृतांची संख्या दोन, संशयित आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

फुलेनगर येथे अनैतिक सबंधातून प्रेयसीसह तिच्या मुलीस आणि नातीस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये विवाहिता प्रीती शेंडगे (रा.कोणार्कनगर) व त्यांची कन्या अर्थात प्रेसयसीची नात सिध्दी रामेश्वर शेंडगे (वय,९) यांच्यासह ४० वर्षीय प्रेयसीवर रॉकेल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न नाशिकमधील पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात झाल्याचे उघडकीस आली होती. Panchavati Immoral Relations Man arrested Burnt three woman baby died

दरम्यान या प्रकरणातील आरोपी जलालुद्दीन खान यास अलिगढ (उत्तरप्रदेश) येथून पंचवटी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

या घटनेत मंगळवारी बालिका सिध्दीचा मृत्यू झाला तर मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी प्रेयसी संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेत आजी-नातीचा मृत्यू झाला असून प्रेयसी महिला संगीता देवरे यांची मुलगी प्रीती गंभीर असून मृत्यूशी झुंजत आहे. त्या उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.  Panchavati Immoral Relations Man arrested Burnt three woman baby died

या प्रकरणातील संशयित आरोपी  हा परप्रांतीय जलालुद्दीन खान (रा. उत्तरप्रदेश, मथुरा) याच्या शोधात उत्तरप्रदेशात गेले होते. आज (दि. ७) रोजी त्याच्या मुसक्या आवळण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे.

काय आहे प्रकरण : पंचवटी : पाच वर्षांपूर्वी जडलेल्या अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसी, तिची मुलगी आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलेला आहे.पेठरोड वरील फुलेनगर भागात मायको दवाखान्याजवळ आज पहाटे 4 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. संगीता देवरे यांचे गेल्या पाच वर्षांपासून मथुरा येथे राहणाऱ्या जलाउद्दीन खान याच्याशी अनैतिक संबंध होते. #NashikOnWeb

या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वादीवाद सुरू होते. यादरम्यान आज रात्रीच्या सुमारास पुन्हा बाचाबाची झाली होती. संगीता देवरे यांची मुलगी प्रीती शेंडगे, नात सिद्धी शेंडगे हे गाढ झोपेत असतांना संशयित जलाउद्दीन खान याने गादीवर रॉकेल टाकून तिघींना पेटवून दिले आहे.पहाटे घडलेल्या या घटनेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचार सुरू असताना 9 महिन्याच्या सिद्धी शेंडगे या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर संगीता आणि प्रीती शेंडगे यांच्यावर जळीतकक्षामध्ये उपचार सुरु आहेत.या घटनेनंतर प्रियकर आरोपी जलाउद्दीन खान हा फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांनी सांगितले. Panchavati Immoral Relations Man arrested Burnt three woman baby died

हा धक्कादायक प्रकार असून एकूणच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

NashikOnWeb.com च्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे अपडेट्स : https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H

Panchavati Immoral Relations Man arrested Burnt three woman baby died
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.