रचनाचित्रांमधून उलगडणार लोककलेचे अवघे विश्व अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील, स्वाती बेदमुथा यांचे कलाविश्वात पदार्पण
कलेच्या जोपासनेमुळे अवघ आयुष्य बदलत असं कायमच बोलल जात. याचाच अनुभव अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या महिलांनी घेतला आहे. लोककलांचा अभ्यास करून त्यांनी वैयक्तिक धाटणीच्या रचनाचित्रांची निर्मिती केली आहे. आता हीच निर्मिती ‘अरंगेत्रम : एका नव्या चित्रविश्वात पदापर्ण’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत आहेत. Painting Exhibition
कुसुमाग्रज स्मारक, छंदोमयी, गंगापूर रोड, येथे दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८: ३० वाजेपर्यत सदरच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन विनामुल्य सर्वांसाठी खुले आहे.
जीवनात कलेला अन्यय साधारण महत्व आहे. मात्र रोजच्या धावपळीत प्रत्येकाला आवडती कला जोपासता येते असे होत नाही. मात्र काहीजण यातून नक्कीच मार्ग काढतात.
अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या महिलांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय सांभाळून चित्रकला जोपासतांना स्वतंत्रपणे लोककलांचे अध्ययन केले. यामध्ये मधुबनी, वारली, ओरिसा पट्टचित्र, मांडणा, हजारीबाघ, फड पेंटीग, संथल पेंटीग, गोंड, कालीघाट, गुर्जरी, कर्नाटक लेदरपपेट्री, धुलीशिल्प, कलमकारी, चित्रकथी, पिठोरा चित्र यांचा अभ्यास केला.
विशेष म्हणजे या महिलांपैकी कुणीही व्यवसायाने मुळीच चित्रकार नाही. कुणी स्त्रीरोग तज्ञ, आयटी तंत्रज्ञ, व्यावसायिक अशीच त्यांची ओळख आहे. मात्र आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण चित्रकार सुहास जोशी यांच्याकडून अडीच वर्ष घेतले.
त्यानंतर स्वतंत्रपणे पुढे काही तरी करायचे या ध्यासातून ‘अरंगेत्रम’ ची सुरुवात झाली आहे. भारतातील लोककला हे देशाचे वैभव आणि ओळख आहे. मग याच कलेला आपल्या दृष्टीने अभ्यासून वैयक्तिक धाटणीच्या रचनाचित्रांमधून त्यांचे मनोविश्व उलगडण्याचा या चौघीं जणींनी प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना क्युरेटर स्नेहल तांबुळवाडीकर – खेडकर या चित्रकार, कला इतिहासकार आणि समीक्षक यांचीही मोलाची साथ लाभली आहे. तेव्हा त्यांचा हाच प्रयत्न पाहण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी कलारसिकांनी यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Painting Exhibition
One thought on “Painting Exhibition प्रथमच ‘अरंगेत्रम’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन”