ओए लक्की! लक्की ओए! – नाशकात पोलिसांना सापडला लखपती बावीसवर्षीय चोर (फोटो )

अभय देवोल या अभिनेत्याने अभिनय करत एक पात्र रंगविले होते लक्की नावाचे आणि त्याचा चित्रपट होता ओए लक्की! लक्की ओए!  यामध्ये अभय एक चांगल्या घरातील मुलगा असे वावरत असतो आणि चोऱ्या करत असतो.मात्र हा चोर असतो उचल्या चोर ..म्हणजे जे हाताला दिसेल ते चोरणे …कुत्रा,गाडी,कुलूप,टीव्ही घरातील कोणतीही वस्तू जी कोणत्याही किंमतीत विकली जाईल..त्यामुळे अश्या तुरळक चोऱ्या लक्षात राहत नसे आणि तक्रारदार पोलिसात जावून विसरत असे. मात्र जेव्हा लक्कीच्या चोऱ्या एक ऑफिसरला कळतात तर लक्की चोऱ्या करत कोट्यावधी कमवलेल असते..असो ..

या कथानकाचे प्रयोजन असे की नाशिक पोलिसांनी असाच एक चोर पकडला आहे….वय वर्षे २२ आणि संपत्ती म्हणाल तर लखपती गोष्टी सर्व त्याने कमावल्या त्या फक्त चोर्य कर्मावर ….

नाशिकमधील चोर लक्की —

आपल्या अंशिक  मधील  पेठ रोड भागात २२ वर्षीय किरण सोनवणे राहतो. घरात कोणीच कमवते नसताना मात्र सर्व सुविधांनी घर एकदम भरले आहे. यामध्ये हा चोर  रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडत होता. तर हे सर्व करण्यासाठी हा चोर तर तासी पल्सर गाडीचे एक हजार रुपये भाडे सुद्धा देत होता. मात्र एका ठिकाणी चोरी करताना सोन साखळी चोरताना   अपघातामुळे पोलिसांच्या जाळ्यात फसला आणि पोलिसांनी त्याची अधिक माहिती मिळवली असता..या चोऱ्यांच्या धंद्यातून तो चक्क करोडपती झाल्याचं समोर आल आहे, त्यामुळे पोलिस सुद्धा हैराण झाले आहेत.

शहरात तब्बल 1 हजार रुपये तासाने महाविद्यालयीन युवकांकडून दुचाकी भाड्याने घेऊन सोनसाखळी,मंगळसूत्र ओरबडण्याचं काम किरण व त्याचा साथीदार विलास मिरजकर हे करत होते..शुक्रवारी कोणार्कनगर भागात एका महिलेची सोनसाखळी चोरून पसार होत असतानाच एका जागरूक नागरिकाने पाठलाग केल्याने या दोघांनी भाड्याने घेतलेली विना नंबर असलेली गाडी सोडून पळ काढला..मग पोलिसांनी आपली तपासाची चक्रे  फिरवत या दोघांना ताब्यात घेतलं आहे..आणि तपास करण्यासाठी जेव्हा पोलीस किरणच्या घरी पोहोचले तर किरणच्या घरचे वैभव पाहून पोलिसच चक्रावून गेले…आता आणखी कुठे कुठे याची संपत्ती आहे पोलीस याचा तपास करत आहे..
रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण सोनवणे उंची उंची वस्त्रे,महागडे घड्याळं, सोन्याच्या वस्तू,इंपोर्टेड शूज असे मोठमोठे शौक ठेवत असल्याचं आता समोर आले आहे. कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी हा इझी मनीचा पर्याय अनेक महिलांच्या सौभाग्यावरच घाला घालत आहे..आणि आता यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलत या धुमस्टाईल चोरांना त्यांच्याच शब्दांत त्यांना उत्तर द्यावे अशी माफक अपेक्षा नाशिककर करत आहेत.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.