Oxygen ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार

नाशिक (प्रतिनिधी) :- ऑक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज दिल्या आहेत. Oxygen
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते.
गटाच्या मागील बैठकीत नेमून दिलेल्या कामाची सद्यस्थिती सादर करण्याबाबत संबंधित सदस्यांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सर्व सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांसाठी आज रोजी दररोज 3 हजार 801 ऑक्सिजनच्या जम्बो सिलिंडरची मागणी असून जिल्ह्यातील आजचा पुरवठा हा 5 हजार 571 जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांच्याकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा हा जिल्ह्यात आज रोजी रुग्णालयांना पुरेसा असून रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाऱ्या स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्रीमती माधुरी पवार यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत.
तसेच ज्या ठिकाणी सदर औषधांचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.Oxygen

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.