ylliX - Online Advertising Network

देश आणि देशवासियांनी खूप प्रेम दिले धन्यवाद – जवान चंदू चव्हाण

देश आणि देशवासियांनी खूप प्रेम दिले धन्यवाद – जवान चंदू चव्हाण 
अश्रू अनावर आपला देश फार महान आहे.आजीचे लिलाबाई पाटील (६५) यांच्या अस्थींचे विसर्जन
नाशिक : प्रतिनिधी
मी आज जिवंत आणि नी सुखरूप भारतात आहे.हे फक्त आपल्या देशामुळे शक्य झाले असून आपण देशवासियांनी केलेल्या अपार प्रेमामुळे मी सुखरूप देशात परतू शकलो आपले सर्वांचे प्रयत्न झाले म्हणून हे शक्य झाले आपले सर्वांचे धन्यवाद असे भावनिक उद्गार आज जवान चंदू चव्हाण याने व्यक्त केले आहेत.चंदू चव्हाण यांच्या हस्ते आज (रविवारी) नाशिकला रामकुंडात त्यांच्या आजीच्या अस्थिंचे विसर्जन झाले.त्या करिता आज जवान चंदू चव्हाण नाशिकला आले होते. माध्यमासोबत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आमत्र ते खूप भावनिक झाले होते तर त्यांना त्यांचे अश्रू आवरता येत नव्हते आपला देश महान आहे असे ते बोलत होते.
शनिवारी प्रथमच तो बोरविहिर या मुळ गावी आला. त्यानंतर आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चंदू आपल्या भावासह मामा, आत्याबहीण आदि नातेवाईकांसोबत आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गोदाकाठावर पोहचला. आजीचे लिलाबाई पाटील (६५) यांच्या अस्थींचे विसर्जन चंदू याने रामकुंडाजवळील अस्थीकुंडात केले.
सर्जिकल स्ट्राईक नंतर अनवधानाने पाकिस्तानात चंदू चव्हाण गेले होते.ते अनेक महिने पाकिस्थांनच्या ताब्यात होते. देशाच्या अथक प्रयत्नाने  चंदू यांना पुन्हा मायदेशी आणले होते.
पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या बातमीच्या धक्‍य्याने त्यांच्या आजीचे निधन झाले होते. चंदू हे सुरक्षित भारतात येईपर्यंत त्यांच्या अस्थिचे विसर्जन न करण्याचा निर्णय चंदू चव्हाण यांच्या परिवाराने घेतला होता.  त्यामुळे पाकिस्तानातून सुखरुप परत आल्यानंतरच आज चंदू यांच्या हाताने  नाशिकच्या रामकुंडात त्यांच्या आजीच्या अस्थीचे विसजन करण्यात आले आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.