ylliX - Online Advertising Network

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३० सप्टेंबर शेवटची संधी

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३० सप्टेंबर शेवटची संधी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या प्रवेश प्रक्रिया  सुरु आहे. राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली होती. तथापि ३० सप्टेंबर पर्यंत विलंब शुल्कासह असलेली अखेरची मुदत संपुष्टात येत असून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन संकेतस्थळ

 शिक्षणापासून दुरावलेल्या तसेच या ना त्या कारणाने शिक्षण अर्धवट राहिलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात शंभराहून अधिक शिक्षणक्रम सुरु केले आहेत. एकूण आठ विद्याशाखांच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील निरनिराळ्या कौशल्याधारित शिक्षणक्रमांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने ३० सप्टेंबर पर्यंत विलंब शुल्कासह मुदत दिली असून ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 मुक्त विद्यापीठाची राज्यात अमरावती, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक अशी एकूण आठ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac अथवा ycmou.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.