onion rates कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, नाफेड ५० हजार टन कांदा खरेदी करणार

केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ग्राहक संरक्षण विभाग या केंद्र सरकारच्या मंत्रालयामार्फत  कांदा खरेदी करणार असल्याचे ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीमध्ये खुल्या पद्धतीने ही खरेदी केली जाणार आहे.लॉकडाऊनच्या काळात नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘नाफेड’ ही संस्था गुजरात व महाराष्ट्रातून नऊशे रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार  आहे. शेतकर्‍यांना विक्रीचा पर्याय मिळावा, देशात कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ‘नाफेड’तर्फे दरवर्षी कांदा खरेदी केला जातो.onion rates

Nashik Onion November 2019 aajcha kanda bhav above rupees 5100 apmc News On Web Marathi उन्हाळ कांदा लासलगाव नाशिक निफाड पिंपळगाव भाव वधारले


करोनामुळे यंदा कांदा उत्पादकांना दराची चिंता वाटत होती. मात्र, आता नाफेडने गुजरात व महाराष्ट्रातून कांदा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. शेतकर्‍यांना किमान नऊशे रुपये दर निश्चितपणे मिळणार आहे. व्यापार्‍यांना त्यापेक्षा कमी दराने खरेदी करता येणार नाही. जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘नाफेड’ने गेल्या वर्षी गुजरात व महाराष्ट्रातून ५७  हजार क्विंटल कांदा खरेदी केला होता. तर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज सुमारे ८९ हजार क्विंटल कांदा विक्रीला येत आहे.onion rates

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.