नाशिक विभागात विक्रमी उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. नाशिक विभागात उन्हाळ कांदा लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३६ हजार ३२६ हेक्टर आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विभागात एकूण १ लाख ७७ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. onion production
जिल्हा | सरासरी क्षेत्र | झालेली लागवड |
नाशिक | २०,५८४ | १,४९,८६६ |
धुळे | ६,१४२ | १४,७८९ |
जळगाव | ६,२७५ | ९,८९१ |
नंदुरबार | ३,३२५ | २,५८७ |
एकूण | ३६,३२६ | १,७७,१३ |
खानदेशात कांदा लागवड यंदा विक्रमी स्थितीत पोचली असून, मागील तीन वर्षांमधील सर्वाधिक म्हणजेच साडेसात हजार हेक्टरवर ही लागवड झाल्याची माहिती आहे. लागवड अजून सुरूच आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यांतील यावल व चोपडा हे भाग लागवडीत आघाडीवर आहेत.
कांद्याच्या किमतीने आधी ग्राहकांना रडवले, नंतर शेतकऱ्यांना …आणि आता कांदा सरकारला रडवण्याचे काम करीत आहे. कांद्याचे नवे उत्पादन आल्यामुळे कांद्याच्या किमती घसरल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारने तुर्कीवरून मागवलेला कांदा तसाच पडून आहे. तो कांदा सडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे अवघ्या प्रति किलो 10 रुपये दराने राज्यांना कांदा विकण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली आहे.onion production
केंद्र सरकार नाफेड आणि एमएमटीसी या यंत्रणांच्या माध्यमातून कांदा राज्यांना विकत आहे. बाजारात कांद्याचे नवे उत्पादन आल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील लासलगाव बाजारात अवघ्या 1,780 रुपये प्रति क्विंटल दरापर्यंत कांद्याची विक्री होताना दिसत आहे.
ग्राहक विदेशी कांद्यापेक्षा देशी कांद्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून आणलेल्या कांद्याला खरेदीदार मिळताना दिसत नाहीत. तुर्कस्तानचा आयात कांदा जेएनपीटी बंदरात मोठय़ा प्रमाणात पडून आहे. हा कांदा सडण्याची भीती आहे. तो विकताना सरकारला घाम फुटत आहे. शेतकरीदेखील कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने हैराण आहे. onion production