ylliX - Online Advertising Network

लासलगाव कांदा लिलाव : कांद्याच्या सरासरी भावात १८% घट

लासलगाव बाजार समितीतमध्ये गेल्या २० एप्रिलपासून बंद असलेले कांदा लिलाव सोमवारपासून अखेर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचे लिलाव झाल्यानंतर रोख अथवा राष्ट्रीयकृत बँकेचे धनादेश देण्याच्या अटीवर लिलाव हे पूर्वरत झाले आहेत. तर १८ एप्रिल उन्हाळ २६२४५ क्विंटल कांद्याची आवक होऊन सरासरी ५७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते.१८ एप्रिल च्या तुलनेने कांद्याच्या सरासरी भावात १८% घट झालेली आहे.

याआधी कांदा विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मालाची चुकवती रोख अथवा एनईएफटी द्वारे करावे अशी भूमिका लासलगाव शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार बाजार समितीने घेऊन जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये रोख स्वरुपात सुरु असलेल्या व्यवहाराच्या धर्तीवर लासलगाव मध्ये सुद्धा रोखीने चुकवती करावी या मागणीला वरून लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद होते. लिलाव सुरु झाल्यामुळे शेतकरी वर्गासह,स्थानिक बाजारपेठेत उत्साह दिसून आला. १८ एप्रिल उन्हाळ २६२४५ क्विंटल कांद्याची आवक होऊन सरासरी ५७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते.१८ एप्रिल च्या तुलनेने कांद्याच्या सरासरी भावात १८% घट झालेली आहे. मुंबई, दिल्लीत कांद्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर जसा गहजब उडतो, तसा तो भाव कमी झाल्यावर होत नाही, हा शेतकऱ्यांचा नेहमीचा आक्षेप. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे.

उन्हाळी कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे.तीन ते चार रुपये किलो दराने कांदा विकण्याची नामुष्की आलेली आहे.सरकार कोणतेही येवो मात्र शेतकऱ्यांची समस्या कोणीही जाणू शकत नाही. विरोधक असताना शेतकरी हितासाठी बोलणारे आता सत्तेत आल्या नंतर गप्प का असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडलेला आहे. सोमवार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ११०० नगाची आवक होऊन कांद्याला कमीत कमी ३०० रुपये सरासरी ४७० रुपये जास्तीत जास्त ६०० रुपये भाव मिळाले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.