कांदा आवक वाढली कांदा भाव घसरला
नाशिक : ओखी वादळामुळे बाजारात कांदा विक्रीला आला नाही त्यामुळे कांदा भाव वाढला होता. त्यात जवळपास एक हजार रुपयांची सरासरी वाढ दिसून आली होती. मात्र वातावरण निवळताच कांदा आवक पुन्हा वाढली असून कांदा भाव कमी झाले आहेत. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यासह , कर्नाटक, आंध्रप्रदेशसह गुजरातमधील काढणीला आलेल्या नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर पूर्ण देशात कांद्याची मागणी वाढली आहे.
मागच्या आठवड्यात कांद्याचे निर्यात मूल्य सरकारने वाढवले होते. कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी किमान निर्यातमूल्य ८५० डाॅलर प्रति टन केल्यामुळे निर्यातीला आळा बसून कांदा दरात घसरण झाली होती. त्यामुळे सरासरी अशी भावात क्विंटल मागे १२०० रु. कांदा भाव घसरले होते. त्यामुळे भाव घसरून नुकसान होऊ नये यासाठी शेतकºयांनी कांदा विक्रीस आणत होते. तर दुसरीकडे काही दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली. भाव वाढ झाली होती . मात्र वातावरण चांगले होताच मात्र पुन्हा कांद्याची आवक वाढली आहे. जास्त प्रमाणात येण्यास सुरु वात झाल्यावर बाजारभाव खाली येतील असे बाजार समितीने सांगितले आहे.
- लासलगाव बाजार सामितित लाल कांद्याची १४५० वाहनांची आवक
- सकाळच्या सत्रात जास्तीजास्त ४०१२ रु , सरासरी ३५५ रु तर
- कमीतकमी दोन हजार रु प्रति क्विंटलला
- दुपारच्या सत्रात कांद्याची आवक वाढल्याने
- कांद्याच्या सरासरी दरात पुन्हा ७०० रु पयांची घसरण
- कांद्याला सरासरी २८०० रु प्रति क्विंटल भाव
- https://www.facebook.com/NashikOnWeb/