देशात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक नागरिक त्याबद्दल तक्रारी करत आहेत. त्या कारणाने केंद्र सरकारने कांदा भाव नियंत्रित करता यावे म्हणून कांदा साठवणूक करत असलेल्या व्यापारी वर्गावर कारवाई करा असे आदेश राज्य शासनाला दिले आहे.(Merchant Of Onion)
त्यानुसार राज्यातील रसर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात कारवाई सुरु केली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार सोमवारी दि.९ रोजी पुरवठा विभागाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जवळपास ९ अडत्यांच्या दुकानांची कसून तपासणी केली आहे. मात्र या केलेल्या तपासणीत कांदा साठा मर्यादेत आढळून आला आहे,
त्यात कोठेही निर्देशित केलेल्या संख्येच्या बाहेर कांदा आढळून आला नाही. बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा दिसून येतो आहे. अनेक घरे, हॉटेल मध्ये कांदा जवळपास हद्दपार झाला असे चित्र आहे. किरकोळ बाजारात वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने उपायोजना करत आहे. यामध्ये कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून केंद्र सरकारने या अगोदर मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे कांद्याच्या घाऊक, किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारे कांदा तोही जास्त प्रमाणात साठवून ठेवता येणार नाही. तर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या सोबतच पुढे झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे व इतर शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. कांद्याची बाजारात आवक कमी झाली त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडले आहे.
बाजारात हवा तसा कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कांदा टंचाई पाहता तुर्की आणि इतर देशातून कांदा मागवला आहे. मात्र हा कांदा काही गृहिणी वर्गाला रुचलेला दिसत नाही, त्यामुळे त्याच्या खरेदी कडे पाठ फिरवली आहे.(Merchant Of Onion)
अशा परिस्थितीमध्ये देशात पिकत असलेल्या आणि साठवणूक केलेला लाल कांदा व्यापा-यांकडून कांदा साठवणुकीची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध पाळले जावे यासाठी कारवाई सुरु केली आहे.
यावेळी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ९ अडत्यांच्या दुकानांची पंचासमक्ष तपासणी केली. तपासणीदरम्यान साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे सापडले नाही.
रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.
8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. maharashtra nashik onion rates
इथे वाचा :- Red Onion लाल कांद्याचे भाव दोन हजार रुपयांनी पडले, हे आहे कारण
One thought on “Merchant Of Onion येवल्यात कांदा आडत्यांवर कारवाई”