नाशिक : देशातील कांदा भाव ठरवणारी आणि संपूर्ण देशासह आशियातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मागील आठवडयाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक सोबतच नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे आगमन यामुळे कांद्याच्या प्रति क्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होती. गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भाव १३९४ रूपयांनी विक्री झाली आहे. onion market lasalgon good price hike for onion farmer happy
लासलगाव बाजारपेठेत होणारी कांद्याची कमी आवक, चांगले दर्जाचे उन्हाळा कांदा कमी येत आहे. महाराष्ट्रात खान्देश भागात लवकर येणारा नवीन लाल कांदा पावसा अभावी सध्या येत नाही तसेच तयार होत असलेला नवीन लाल कांदा हा पोषक नाही त्याला नेहमीसारखे वजन नाही.onion market lasalgon good price hike for onion farmer happy
यामुळे दसरा सणापर्यत होणारी आवक कमी असणार आहे. कांदा निर्यातदार व्यापारी सांगत आहेत. कमी पावसामुळे लाल कांद्याची न झालेली वाढ याचा यामुळे आवक कमी होण्याची मोठी शक्यता आहे. त्याचा मागणीचा दाब सध्या सुमार दर्जाचे उन्हाळा कांदा भाव वाढतील अशी स्थिती आहे.onion market lasalgon good price hike for onion farmer happy
पुढील दिवसात कांदा बाजारपेठेत नवीन कांदा चांगले प्रमाणावर आला तर तेजी पुर्वपदावर येईल असे काही मान्यवरांचे मत व्यक्त केले आहे. लासलगाव कांदा बाजारपेठेत गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६४,३४४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ३५१ कमाल रु पये १,०७८ तर सर्वसाधारण रुपये ८९३ प्रति क्विंटल राहिले होते. त्यामुळे शेतकरी राजाला थोडा तरी दिलासा मिळणार आहे, मात्र नियमित बाजारात कांदा सध्या तरी वाढणार नाही त्यामुळे नागरिकांना चिंतेचे कारण नाही.
इथे वाचा आजचा कांदा भाव : 12 ऑक्टोबर 2018
One thought on “कांद्याची कमी आवक; मिळाला चांगला भाव, शेतकरीवर्गाला थोडा दिलासा”