यंदाच्या खरीप हंगामात देशातलं कांदा उत्पादन 26 टक्केम्हणजे 52 लाख टनानं घसरलं आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्यामुळे दबावयेत असल्याचं अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं. ते लोकसभेत लेखी उत्तरातबोलत होते. Onion India
मान्सून आगमन उशिरा झाल्यामुळे कांद्याचं पेरणी क्षेत्र घटलं तसंचपेरणीलाही 3 ते 4 आठवडे विलंब झाला. त्यातच महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशया कांदाउत्पादक प्रमुख राज्यांमधे पावसाळा लांबला. त्यामुळे कांद्याच्या उभ्यापिकाचं नुकसान झाल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलं. या सगळ्यामुळे उत्पादनावरपरिणाम झाला. सप्टेंबर ऑक्टोबरमधे पडलेल्या पावसामुळे कांद्यांची वाहतूक रखडल, अशीमाहितीही त्यांनी दिली.
जिल्ह्यात उपबाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव
अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान पाहता, आता अगदी थोड्या प्रमाणात हका होईना बळीराजाला त्याच्या मालाला चांगला भाव मिळताना दिसत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील वणी बाजार बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळाला आहे. या बाजार समितीत मंगळवारी कांद्याला विक्रमी असा ६३८० रूपये भाव मिळाला आहे.
कांद्याच्या मागणीत सतत वाढ होतांना दिसत असून, त्यात आता कांदा आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात गती तर दिसून येतेय सोबतच कांद्याला चांगला भाव सुद्धा मिलताना दिसत आहे.
मंगळवारी उपबाजारात ९ गाड्यांमधून १८० क्विंटल कांदा आवक झाली आहे. यामध्ये बाजरातील दर पाहता ६३८० कमाल, ५९०३ किमान तर ६१८० रुपये सरासरी अशा दराने व्यापारी वर्गाने कांदा खरेदी केला आहे.
अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे दक्षिणेतील कांदा सुद्धा कमी प्रमाणत बाजारात येतांना दिसतोय. त्यामुळे देशांतर्गत वाढलेली मागणी व परप्रांतीय व्यापाऱ्यांचा स्थानिक व्यापाऱ्यांकडे कांदा खरेदीसाठीचा पाठपुरावा यामुळे दरात तेजी कायम असल्याचे दिसून येते आहे.
नियोजनबद्ध पद्धतीने कांदा विक्र ी करणारे उत्पादक यांना बाजारातील चढउताराच्या व्यवहार प्रणालीच्या माहितीतून ज्ञान असुन र्इंटरनेटच्या माध्यमातुन देशभरातील कांदा दराची घाऊक तसेच किरकोळ माहिती प्राप्त होत आहे.त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी योग्य वेळ पाहून कांदा विकत आहेत. व्यावसायिक देखील बाजरातील मागणी पाहून कांदा खरेदीवर भर देत असून त्यामुळे कांदा दारात तेजी दिसून येते आहे.Onion India