कोणत्याही पक्षाने सत्तेचा वापर कांदा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला नसून केवळ निवडणुकीपुरता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वापर राजकीय नेत्यांनी केला आहे. कांदा निर्यात धोरण असो किंवा देशांतर्गत कांदा भाव कोणत्याही प्रश्नावर कोणीही ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळतच असून शेतकऱ्यांवर आत्मत्या करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन करत कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल भाव दिला जावा, अन्यथा येत्या निवडणुकांत नेत्यांचे फिरणे मुश्कील करून राजकीय सभा उधळून लावण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला. onion grower farmer agitation rates issue scatter political public meeting
आज सोमवारी (दि.11) पत्रकार परिषदेत दिघोळे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे खंडेराव दिघोेळे, नितीन दिघोळे, सतीश दिघोळे, अतुल गीते उपस्थित होते.
इथे क्लिक करून वाचा लासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 11 फेब्रुवारी 2019
महत्वाचे आरोप :
- सरकारने कांदा जीवनाश्यक वस्तूच्या यादीत टाकला.
- कांद्याला दोनशे रुपये अनुदान देऊन सरकारचा शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.
- कांदा निर्यात धोरणातील धरसोड वृत्ती.
- केंद्रात राज्यात सरकारे बदलत असतात. मात्र, कांदा प्रश्नावर कोणीही तोडगा काढत नाही.
- केवळ निवडणुकीपुरत शेतकर्यांचा वापर केला आहे.
महत्वाचे प्रश्न/मुद्दे :
- सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची भेट घेणार
- कांदा प्रश्नाबाद्दल्ची भूमिका विचारणार
- ठोस आश्वासन द्या अथवा सभा उधळू
- कांदा प्रश्न उत्पादकच सोडवू शकतात.
- या प्रश्नावर आता आर या पार.
महत्वाची मागणी :
- सध्या कांद्याला दीड हजार क्विंटल रुपये भाव जाहीर करावा.
onion grower farmer agitation rates issue scatter political public meeting
कांदा उत्पादांच्या प्रश्नांवर हे उपाय दृष्टीक्षेपात :
- कांदा उत्पादकांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी लवकरच कॉल सेंटर सुरु होणार.
- संघटनेतर्फे यात लागवड, काढणी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, थेट बाजारपेठ, बाजार भाव, जवळचे मार्केट आदीबाबत मिळणार माहिती.
- कांदा उत्पादकांची वर्षातून एकदा परिषदेचे आयोजन करणे,
- कांदयासाठी नवीन बाजारपेठा शोधणे,
- बाहेर देशात कांदा निर्यातीची माहिती, आदी विषयांवर काम सुरु केले जाणार असल्याची माहिती दिघोळे यांनी दिली आहे.