ylliX - Online Advertising Network

उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी जास्तीत जास्त १४५१ रुपये भाव जाहिर

लासलगांव वार्ताहर- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी  घेतली असून आज उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त १४५१ रुपये भाव जाहिर झाला.येथील मुख्य बाजार समितित मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त १०११ रुपये भाव मिळाला होता.

मंगलवार च्या तुलनेने कांद्याच्या दरात ४४० रुपयांनी भाव वाढ दिसून आली.कांद्याची मागणी वाढल्याने कांदा हजारी पार झाल्याचे दिसत आहे. ४५ राज्यातून नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांदा भावात सुधारणा झाली आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासुन सोमवारी दररोज २२ ते३० हजारे क्विंटल आवक येत आहे.

सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत पाठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजनही घटत आहे. अशा परिस्थितीत जरी कांदयाचे भाव वाढत असले तरी कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून अजूनही शेतकरी वर्गाला झालेला खर्च निघनेही मुश्किल झालेले आहे.

 मध्यंतरी मध्य प्रदेश सरकारने ८०० रुपये प्रति क्विंटल ने  कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. हा कांदा त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम या राज्यांना पाठविला होता.आता मध्यप्रदेशकडून साठवलेला कांदा संपल्याने इतर राज्याना कांदा पाहिजे त्या प्रमाणात जात नसल्याने देशातुन लासलगांवच्या कांद्याला मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.आज लासलगांव येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६००  रुपये,सरासरी १२५० रुपये जास्तीत जास्त १४५१ रुपये भाव मिळले.

nashik on web news online live weather dhol

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,  आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.