ylliX - Online Advertising Network

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, कांदा साठवणुकीची मर्यादा निश्चित

Onion exports restricted 2019

नाशिक : देशभरात कांद्याची वाढती मागणी, त्यानुसार असलेला कमी पुरवठा/साठा यामुळे वाढलेल्या किमतींमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले असताना केंद्र सरकार मात्र सातत्याने या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहे. कांदा निर्यात शुल्क 850 डॉलर्स प्रती क्विंटल एवढे केल्याच्या निर्णयानंतर कांदा दरावर परिणाम होत नसल्याचे दिसते. अशावेळी अता केंद्र सरकारने थेट कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा  निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

देशात या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाले असून देशातील बाजारांमध्ये मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय घातक असून, अशा निर्णयाची काहीच गरज नसल्याचे शेतकरी नेते म्हणत आहेत.

केंद्र सरकारची कृषी संबंधित पथके नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या साठवणूक बद्दल गेल्या आठवड्यात पाहणी करून गेली होती. त्यावेळी कांद्याच्या साठवणूकीवर मर्यादा येणार असल्याचे सांगितले जात होते. झालेही तसेच. किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना 100 क्विंटल ची मर्यादा घेतली गेली असून ठोक व्यापाऱ्यांना केवळ 500 क्विंटल ची मर्यादा निश्चित केली आहे. केंद्राने साठेबाजांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे.

देशातील विविध बाजारपेठेत दक्षिण भारतातून येणार कांदाही अद्याप आलेला  नाही. राज्यातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव गगनाला भिडून निवडणुका होऊ घातलेल्या महाराष्ट्रात कांद्याचा वांधा होऊ नये यासाठी हा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने जेव्हा बाजार सुरू होईल तेव्हा निर्यात होऊ घातलेला कांदा स्थानिक बाजारात उपलब्ध होणार असल्याने आवक वाढून दरांवर परिमाण होतील असे सांगितले जात असले तरी साठवलेला कांदाही कमीच असल्याने कांदा बाजारभाव कमी होतील अशी शक्यता कमीच आहे.

मात्र साठवलेला कांदा योग्य वेळेत (खराब होण्याच्या आत) बाजारात आणून शेतकऱ्यांना विकणे भाग असले तरी टप्याटप्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कांदा बाजारात आणावा. कारण कारवाई होऊन ती साठेबाजांवर होईल. कांदा भाव वाढण्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनी घेण्याचे ठरवले तर योग्य निर्णय घेऊन बाजाराचा मुड बघत कांदा बाजारात आणावा. सोमवारी/मंगळवारी बाजार बघून केव्हाही माल विक्रीसाठी आणता येऊ शकतो.

Onion exports restricted 2019

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.