onion export नाशिकरोड रेल्वे मालधक्कावरून बांगलादेशला कांदा निर्यात

नाशिक शहरातील नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्कावरून आता बांगलादेशला रेल्वेने केली जाणारी कांदा निर्यात सुरु करण्यात आली आहे. याआधी कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत खेरवाडी ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथून ५० ट्रक्समधून रेल्वे वॅगनमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू झाले आहे. पुढे ४२ वॅगनमधून सुमारे १८०० टन कांदा बांगलादेशला जाणार आहे. onion export
काही दिवसांपूर्वीच ४२ वॅगनच्या निफाडहून तीन तर लासलगावहून दोन मालगाड्यातून कांदा पाठविण्यात आला. खेरवाडीहून ७ मे रोजी एक मालगाडी कांदा घेऊन रवाना झाली होती. त्यानंतर मात्र कोरोना संसर्गाचे कारण देत खेरवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्याने खेरवाडी येथून रेल्वेने कांदा निर्यात बंद झाली. कांद्याचे ट्रक हे गावाच्या बाहेरून रमजान ईदमुळे १७ मेपर्यंतच बांगलादेशचे व्यापारी कांदा उचलणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मालगाडीने कांदा पाठविण्यासाठी निफाड, पिंपळगाव बसवंत, कळवण, वणीहून कांद्याचे सुमारे साठ ट्रक खेरवाडी मालधक्क्यावर आले होते. मात्र ग्रामस्थांनी विरोध केल्याने काम थांबले होते. रमजान ईदनंतर कांदा पोहचला तरी उपयोग होणार नाही, हे लक्षात घेऊन बांगलादेशला निर्यात केला जाणारा कांदा नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे आणण्यात आला आहे.onion export

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.