केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यातमुल्य शुन्य केले आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर २८०० ते २९०० रुपयांवर होता. मात्र आता हा दर घसरून, १४०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांद्याची निर्यात आणखी वाढावी, या हेतूने केंद्र सरकारने हा शेतकरीहिताचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १९ जानेवारी राेजी देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मूल्य ८०० एेवजी ७५० डाॅलरपर्यंत कमी केले हाेते.स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात अाल्यामुळे व अावक वाढल्यामुळे निर्यातमूल्य पूर्ण रद्द करण्याची घाेषणा शुक्रवारी सायंकाळी करण्यात अाली. त्यामुळे स्पर्धात्मक दराने निर्यात करणे शक्य हाेईल.वाणिज्य मंत्रालयाने २ फेब्रुवारी राेजी जारी केलेल्या अधिसूचनेत नियमांमध्ये सुधारणा केल्याचे अाणि पुढील सूचना जारी हाेईपर्यंत कांदा निर्यातमूल्य रद्द केल्याचे म्हटले अाहे.भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरीत २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो.लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले.