ylliX - Online Advertising Network

कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने निर्यात प्रोत्साहन योजना लागु करावी – जयदत्त होळकर


onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

लासलगांव (वार्ताहर समीर पठाण) : भारतातुन कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने सुकविलेल्या कांद्याऐवजी सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करणा-या निर्यातदारांकरीता निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु करावी अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत असुन एकट्या लासलगांव बाजार समितीत दररोज साधारणत: 15 ते 17 हजार क्विंटल कांद्याची विक्री होत आहे.

सध्या सदरचा कांदा कमीत कमी रू. 300/-, जास्तीत जास्त रू. 901/- व सरासरी रू. 701/- प्रती क्विंटल दराने विक्री होत असुन सध्या मिळत असलेल्या सरासरी बाजारभावाचा विचार करता येथील शेतक-यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

मागील वर्षाच्या तुलनेत चालु वर्षी राज्यात कांदा उत्पादनात वाढ झाल्याने देशांतर्गत मागणी पुर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक राहणार असुन उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता जास्त असल्याने ज्या शेतक-यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध आहे, अशा शेतक-यांनी त्यांचा कांदा चाळीत साठवुन ठेवला आहे.

त्यामुळे भविष्यात सदर कांद्याच्या आवकेत वाढ होऊन आणखी बाजारभाव कमी होण्याची शक्यता असल्याने सदरचा कांदा वेळीच निर्यात होणे गरजेचे आहे. भारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग पडत असल्याने परदेशी आयातदारांकडुन भारतीय कांद्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे. onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

दि. 24 मे, 2018 रोजी केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिध्द केलेल्या सार्वजनिक सुचनेनुसार भारतातुन सुकविलेल्या कांद्याची निर्यात करणा-या निर्यातदारांना 03 टक्के ऐवजी 05 टक्के निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु केली आहे. मात्र सदर योजनेचा फायदा फक्त ज्या ठिकाणी कांदा सुकविण्याचे प्रकल्प कार्यान्वीत आहे अशाच ठिकाणच्या निर्यातदारांना होणार आहे.

महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यात कांद्यावर प्रक्रिया करून कांदा सुकविण्याचे प्रकल्प नसल्याने केंद्र शासनाच्या सदर योजनेचा राज्यातील कांदा उत्पादकांना काहीएक फायदा होणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सन 2016 मध्ये कांदा निर्यातीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारतातुन ताजा कांदा किंवा कोल्ड स्टोअरेजमध्ये साठविलेला कांदा निर्यात करणा-या निर्यातदारांना 05 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु करून सदर योजनेस दि. 30/09/2017 पर्यंत मुदतवाढ दिली होती. onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

त्याच धर्तीवर चालु वर्षी सुकविलेल्या कांद्याऐवजी सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करणा-या कांदा निर्यातदारांसाठी केंद्र शासनाने 05 टक्के निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु करावी अशी मागणी लासलगांव बाजार समितीने केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्री. होळकर यांनी दिली.

onion export jaydatta holkar lasalgaon damands central government promotion plan

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.