वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नवी दिल्ली यांनी कृष्णापूरम कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी दिली आहे. याबाबत विदेशी व्यापार विभागाचे महासंचालक अमित यादव यांनी माहिती दिली आहे. कृष्णापूरम कांदा हा चवीने तिखट असल्याने याचा मोठ्या प्रमाणात उपयोग सांबरसाठी केला जातो. तसेच औषधी गुणधर्म असल्याने हा 10 हजार मे. टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारने मंजुरी दिली. दुसरीकडे महाराष्ट्रातील कांदा निर्यात मात्र उठवलेली नाही.onion export
आंध्रप्रदेशातील कृष्णपूरम कांद्याला थायलंड, हाँगकाँग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कांद्याचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 28 सप्टेंबर रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. कर्नाटकातून नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या नऊ हजार मे. टन गुलाबी कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिली होती. गुरुवारी पुन्हा आंध्रप्रदेशच्या 10 हजार मे. टन कृष्णपूरम कांदा निर्यातीला मंजुरी दिली असून, चेन्नई पोर्टवरून निर्यात केला जाणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.onion export
नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भाव पंधराशे रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे कांदा निर्यात खुली करण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकारने केवळ तामिळनाडू येथील कृष्णपुरम कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यातही केवळ चेन्नई बंदरातून फक्त 10 हजार टन कांदा पाठवण्याचे बंधन घातले आहे. यामुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढून किमती कोसळण्याची भिती व्यक्त केली जाते.onion export