Onion Export Ban Uplift कांदा निर्यातबंदी हटविली! पासवान यांची ट्विटरवर अस्पष्ट माहिती

कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारतर्फे पूर्णपणे हटविण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एका संक्षिप्त ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या ट्विट मधील माहितीत स्पष्टता नसली तरी यंदा कांद्याचे अंदाजित बंपर उत्पादन आणि ‘स्थिर’ बाजारभाव यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. Onion Export Ban Uplift

पाऊस लांबल्याने मागील हंगामात कांद्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे गगनाला भिडलेले कांदा बाजारभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लाही पावले उचलली होती. १३ सप्टेंबर २०१९ मध्ये कांदावरील निर्यात मुल्य ८५० डॉलर केले होते. त्यांनंतर २९ सप्टेंबर २०१९ला कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी थेट निर्यातबंदी लागू केली होती.

मात्र या जानेवारीपासून कांदा दरात मोठी घसरण झाली. लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला. त्यानंतरही सातत्याने मागणी होऊनही निर्यातबंदी हटविण्यात आली नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे यात बरेच नुकसान झाले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली.

प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करताना शेतकऱ्यांचे विविध शिष्टमंडळेही केंद्रीय मंत्र्यांना भेटले. राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारला पत्र पाठविले होते.

यानंतर केंद्र सरकारकडून नुकतीच एक समिती कांदा दर आणि आवकेचा आढावा घेण्यासाठी आली होती. या समितीने लासलगाव बाजार समितीत पाहणी सुद्धा केली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कांदा उत्पादनाचा अंदाज आल्यानंतर विविध देशांबरोबर केलेले कांदा आयातीचे करार रद्द केले होते. 

या सर्व घडामोडींनंतर अखेर निर्यात बंदी उठविल्याची शक्यता मानली जात आहे. 

या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असले तरी अजूनही याबाबत साशंकता आहेच. कारण पासवान यांच्या ट्विटमध्ये किमान निर्यात मुल्याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या २८.४ लाख टन तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात जवळपास ४० लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज असल्याचे मंत्री पासवान यांनी म्हटले आहे. Onion Export Ban Uplift

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.