ylliX - Online Advertising Network

onion export ban farmers निर्यातबंदी काढावी; अन्यथा तीव्र आंदोलन – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : पावसाने गेल्या नोव्हेंबर पर्यंत मुक्काम केल्याने उत्पन्नावर परिणाम होऊन आवक घटल्याने कांदा भाव पाच वर्षातील उच्चांक गाठून आला. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध लादून पुढे कांदा निर्यात बंदीही केली. त्याने समाधान झाले नाही म्हणून बाहेर देशातील कांदा आयात केल्याने राज्यातील कांदा बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत आज रोजी घसरले आहेत. onion export ban farmers

त्यामुळे केंद्र शासनाने ही निर्यातबंदी तात्काळ उठवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत या आशयाचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातुन शासनाला दिले आहे. जर ही निर्यातबंदी पुढील आठ दिवसात उठवली नाही तर राज्यात या संघटनेच्या माध्यमातुन रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला आहे.

‘कांदा निर्यातबंदी करताना दाखवलेली तत्परता केंद्र सरकारने आता दाखवावी. कांदा नियार्तीवर बंधने लादून पुन्हा शेतकऱ्यांच्या विरोधात पाऊल उचलले अशी धारणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत कांदा उपलब्ध असताना तसेच देशातच उत्तम बाजारभाव कांद्याला मिळत असताना शेतकरी कांदा निर्यात करतील अशी परिस्थिती व शक्यता नव्हती. मात्र सरकारने हे पाऊल उचलल्यानंतरही कांदा भावात फरक पडला नव्हता. या माध्यमातून स्थानिक बाजारात भाव पडण्याच्या भीतीचे वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांना स्वस्तात कांदा विकण्यास भाग पाडण्यासाठीच सरकारने ही बंदी लादली.’ असा आरोप राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनातुन केला आहे.

कांद्याला नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये चांगला भाव मिळाला होता. यामुळे मागील नुकसानातून थोडेबहुत सावरण्यास शेतकऱ्यांना मदत होत होती. असे असताना पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले व आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल यासाठी सरकारने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. सरकारला शहरी ग्राहकासाठी कांदा 20 रुपये किलोच्या पुढे किंमत जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे.

राज्यातील कांदा बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत आज रोजी घसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरीत कांदा निर्यात बंदी हटवुन कांदा आयात करण्याचे थांबवावे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही कांदा निर्यात बंदी विरोधात राज्यभर मोठया प्रमाणात आंदोलन करेल यांची नोंद घ्यावी असा इशारा सोमनाथ गिते, संभाजी गायकवाड, अमोल सानप, रामनाथ येवले, शिवाजी सानप, चंद्रकांत बोडके, राजेंद्र गायकवाड आदींनी दिला आहे. onion export ban farmers

इथे क्लीक करून जाणून घ्या आजचा कांदा भाव – 17 jan 2020

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.