नाशिक : शेतकरी वर्गाला ५ टक्के अनुदान देत फक्त १०० रुपये मदत केली असून ही शेतकरी वर्गाची केलेली गंमत असून त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संगठ्नेने जिल्हाधिकारी दालना जवळ सरकार विरोधात ठिय्या आंदोलन केले असून कांदा फोडो आणि कांदा भाकरी आंदोलन केला आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी केली. नुकत्याच वाढलेल्या आमदारांच्या पगारवाढीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारने 1 रुपये दिलेले अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असून हे अनुदान किलोमागे ५ रुपये करण्यात यावे अशी मागणीदेखील केली.
सत्तेत असलेल्या स्वाभिमानीने हे आंदोलन केले आहे. याव्लेई संगठना उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सरकारवर टीका केली आणि सदाभाऊ खोत यांना काम केलेजाऊ देत नाही अशी टीका देखील केली आहे.
आज त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.