ylliX - Online Advertising Network

गांधी तलावात बुडून एकाचा मृत्यू

नाशिक : शहरातील गोदावरी पात्रातील गांधी तलावात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण मीना असे त्याचे नाव आहे. अन्य दोघांना वाचविण्यात यश आले असून हे तिघे राजस्थान येथून पर्यटनासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. one drown died gandhi talav ramkund godavari river nashik tourist

आज सकाळी शिर्डी, राहता, वैजापूरसाठी गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.

या सोडलेल्या पाण्यामुळे रामकुंडाजवळ पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रामकुंडाला लागून असणाऱ्या गांधी तलावात बुडून त्याचा मृत्यु झाला.

उन्हाळ्यात उष्णतेचा शिन घालविण्यासाठी अनेक तरुण दुपारच्यावेळी पोहण्यासाठी येत असतात. गांधी तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने या पर्यटकांचा घात झाल्याचे बोलले जात आहे.

one drown died gandhi talav ramkund godavari river nashik tourist

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.