ylliX - Online Advertising Network

Omicron Variant ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू, शास्त्रज्ञांचा मोठा इशारा महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले

ब्रिटन : ब्रिटनवर ओमायक्रॉनचा (Omicron in Britain) धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओमायक्रॉनमुळे यूकेमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. संबंधीत मृत व्यक्तीला कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराची (Omicron Variant) होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ओमायक्रॉनने पीडित रुग्णाच्या मृत्यूची पुष्टी केली असून ओमिक्रॉनने पीडित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णामध्ये Omicron प्रकाराची पुष्टी झाली होती.

केवर ओमायक्रॉनचं (Omicron) मोठं संकट आहे. ओमायक्रॉनचा फैलाव होत असताना ब्रिटनमध्ये शनिवारी 54,073 नवीन कोरोना प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमिक्रॉनच्या 633 रुग्णांचा समावेश आहे. तसेच ओमिक्रॉन प्रकरणांची वास्तविक संख्या खूपच जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निक डेव्हिस या संशोधकांनी ओमिक्रॉनचा प्रसार खूप वेगाने होत अशून तो खूपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सध्या ब्रिटनमध्ये दर 2 ते 4 दिवसांनी संक्रमित लोकांची संख्या दुप्पट होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या अहवालात करण्यात आला आहे.

(Boris Johnson)

ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत (Corona Virus New Variant Omicron) मोठा इशारा दिला आहे. एप्रिलच्या अखेरीस देशात ओमिक्रॉनमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 25000ते 75000 पर्यंत असू शकते,असा दावा करण्यात आला आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार यूकेच्या तज्ज्ञांनी कोविडच्या ओमायक्रॉन स्वरूपाबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचे म्हटले आहे. तसेच एखाद्याचे लसीकरण केले असेल तर त्याच्यावर ओमायक्रॉनचा प्रभाव कमी असल्याचे देखील म्हटले आहे. संशोधकांनीकोरोना लसीचा जास्त डोस घेतल्याने ओमिक्रॉनचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉन समोर आला होता. ओमिक्रॉनमउले संपूर्ण जगात भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगातील 47 हून जास्त देशांत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पसरला आहे. अद्याप ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही. पण, झपाट्याने वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेसह युरोपातील अनेक देशांत रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी परी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे 4 तर मुंबईत 3 रुग्ण सापडले होते. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या ओमिक्रॉन बाधित महिलेचे नातेवाईक आहे. या सात पैकी चार रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला होता. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. लसीकरण न झालेला बालक साडेतीन वर्षाचा आहे. विशेष म्हणजे यातील चारही रुग्णांना कोणतेही लक्षण आढळून आले नाहीत. तर तीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत.

मुंबईत तिघांना लागण

दरम्यान, मुंबईत आढलेल्या तिन्ही रुग्णांपैकी एक ४८ वर्षीय रुग्ण टांझानिया येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. 4 डिसेंबर रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.

दुसरा रुग्ण 25 वर्षीय व्यक्ती आहे. तो लंडन येथून 1 डिसेंबर रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. तिसरा व्यक्ती 37 वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) आहे. तो दक्षिण आफ्रिका येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.