भांडणाची कुरापत काढत संत कबीरनगर मध्ये एकाचा खून

नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत जवळपास आठ ते दहा संशयितानी एकास मागील बेदम मारहाण केली. मारहाण करताना या सगळ्यांनी त्याला उचलून जमिनीवर आपटले होते. यात त्यांच्या डोक्यास गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिचा मृत्यु झाला असून,  राजू शेषराव वाघमारे (४५, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, गंगापूर रोड, नाशिक) असे ठार झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

संतप्त नातेवाईक व मित्रपरिवाराने संशयिताना अटक करावी मागणीसाठी गंगापूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. हे प्रकरण १५ जून रोजी रात्री ११ वाजता संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संत कबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (दोघे रा. गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर, अंबड, नाशिक) व त्यांचे तीन ते चार साथीदार असे हातात लाठ्याकाठ्या घेऊन राजू यांच्या घरात शीरले होते.

यामध्ये या सर्वांनी दमदाटी करीत राजू यांना उचलून जमिनीवर आपटत जबर  मारहाण केली होती. घटनेतर राजू यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच गंगापुर पोलिस ठाण्यात संशितावीरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.  दरम्यान रविवारी (दि.१७) रात्री उशिरा  राजूचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात जमिनीच्या वादातुन हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण बुराडे करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.