ylliX - Online Advertising Network

अक्कलकुवा ते नाशिक पायी बिऱ्हाड मोर्चा, शनिवारी नाशकात

नाशिक :विधिमंडळावर शेतकरी लॉंग मार्च निघाला होता. सरकारला सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. आता आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी नंदुरबार येथील अक्कलकुवा ते नाशिक पायी बि-हाड मोर्चा शनिवारी नाशकात येणार आहे.Old demands two thousand Aadivasi Birahad Morch reach nashik Saturday 

या मोर्चेक-यांच्या सरकारविषयीच्या संतप्त भावना असून, याअगोदर मोर्चेक-यांनी आदिवासी विकास भवनावर बायका मुलांसह मारलेल्या ठिय्या आंदोलनाचा पुर्वानुभव अनुभव लक्षात घेता पोलीस व महसूल प्रशासनाने मोर्चाचा मोठा  धसका घेतला असे चित्र आहे.

पूर्वीचा बिर्हाड मोर्चा लक्षात घेता पोलिसांनी आदिवासी विकास भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची विनंती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केलीय.

मागील आठवड्यात पायी नंदुरबार येथील अक्कलकुवा येथून मोर्चा निघाला आहे. जवळपास २५० पेक्षा अधिकचे नाशिक पर्यंतचे अंतर आहे. या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे. मोर्चा मार्गक्रमण करीत आहे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जात आहे.

तळपत्या उन्हात निघालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर येणार आहे. केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार करूनच मोर्चेकरी त्या तयारीने निघाले आहेत. अर्थात मोर्चा हा बिऱ्हाड असणार असून मोर्चेकरी सर्व संसार घेवून निघाले आहेत अधिवासी विकास भवन येथे ते आपला संसार थाटणार आहेत.

कंत्राटी कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासून वेतन अदा करण्यात आलेले नाही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने प्रलंबीत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मागच्या आंदोलनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र यावेळी कोणतेही प्रश्न नकोत यासाठी आपत्ती निवारण कक्ष द्या असे पोलिसांनी जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.

Old demands two thousand Aadivasi Birahad Morch reach nashik Saturday
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.