उत्तर महाराष्ट्रातील मुख्य जिल्हा असलेल्या नाशिकला ओखी वादळाचा फटका बसला आहे. रात्री पासून आकाशात पावसाळा जसा असतो तसे ढग तयार झाले होते. दोन दिवसांपासून नाशिकला गारवा जाणवत नव्हता मात्र मध्यरात्री पासून ढगाळ वातवरण तयार झाले आणि हवेतील गारठा वाढला आहे. दिवसभर तपमान १६ डिग्री सेल्सिअस राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सकाळी ९ नंतर हलक्या स्वरुपात पाऊस सुरु झाला तर दुपारनंतर जिह्यात पावसाचा जोर वाढला होता. या पावसामुळे सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शेतकरी वर्गाला. यामध्ये द्राक्ष, कांदा, मका आणि इतर भाजीपाला पिकाला मोठा फटका बसणार आहे.
ओखी वादळाचा हे मुंबई येथून जेव्हा सुरतकडे सरकत होते तेव्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, सटाना तालुक्यात पाऊस पडत आहे. त्र्यंबकेश्वर येथे काल रात्री गार वारा वाहून रिमझिम पाऊस पडला. या पावसामुळे या भागातील असलेले मुख्य मिक काढणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.
निफाड तालुका येथील लासलगाव, निफाड, उगावसह विंचूर भागासह वेगवान वारा आणि पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे द्रक्षांसह इतर पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी पहाटेनंतर दुपारपर्यंत अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील लासलगाव , विंचुर, निफाड, नैताळे व उगाव परीसरातील गावांमध्ये वेगवान वारा आणि पावसाने झोडपून काढले आहे. या मुळे शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावला आहे.याच परिसरातील असलेलेया वनसगाव, सारोळे खुर्द शिवडी, ब्राह्मणगाव, वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड वारा होता त्यात पावसाचे पाणी साचले त्यामुएल काही द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले. तसेच द्राक्षबागांच्या पानांची पाणगळ झाली. द्राक्ष, कांदा , गहु , डाळिंब या पिकांचे मोठयÞा प्रमाणात नुकसान झाले.
जनजीवन विस्कळीत
वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय होताना दिसून येत आहे. आभाळ भरुन आले होते तर आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. हवेत कमालीचा गारठा असून थंडीत पावसाची भर पडल्याने बाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. याशिवाय, हलकेसे वारे वाहत असल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली होती. दिवसभर ढगाळ वातवरण , पाऊस सोबतच जबरदस्त वारा आणि गारठा वाढला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शहरातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीवर परिणाम दिसून येत आहे. थंडी आणि पाऊस असा दुहेरी माऱ्या मुळे त्रस्त बनलेल्या नाशिककरांनी बाहेर न पडलेच नाहीत. तर शहरात स्वेटर. रेनकोट आणि छत्री असे साहित्य नागरिकांनी सोबत घेतले होते. नेमका कोणता ऋतू आहे हे कळत नव्हते.
सोशल मिडीयावर हास्य कल्लोळ
या अवकाळी पावसावर आणि वादळावर नेटीझन्स ने जोरदार स्टेटस अपडेट केले आहे. यामध्ये एक असे की “देवा सरकार बदलेले तरी चालेले मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे राहू दे …ते लगेच सुट्टी देतात.”
“ आता हा कोणता ऋतू आहे…………………………………..हिवसाळा”
“काल रात्री मी हिवाळा ऋतूत झोपलो होते.. उठेलो तेव्हा पावसाला होता….मी काय अस्वल आहे का सहा महिने झोपायला “
“आम्ही जेव्हा शाळेत होतो……तेव्हा कुठे मेले होते हे वादळ”
“आता आमच्या पिढीकडे बोट दाखवू नका ……………..आम्ही सुद्धा जास्त पावसाळे पाहिले आहेत.”
“कोणाची पावसाची ट्रीप बाकी असून त्यांनी लवकर करा …थोडा दिवस पावसाला आला आहे.”
“इंद्र्देवा मी काय मूर्ख आहे का ? आता मी नाचणार नाही……….मला वेड्यात काढू नका …नाचून वैथाग्लेला मोर”
या प्रकारे सोशल मिडीयावर पावसावर टीका केली गेलीय.