मनोविकृत तरुणाचा फेसबुकवर नग्न होत व्हिडियो कॉलद्वारे ६२८ महिलांना त्रास  

नाशिक : विकृत मनोवृतीच्या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून अनेक फेक अकाऊंट तयार करत, नग्न होत फेसबुक व्हिडियोकॉल करत जवळपास ६२८ महिलांना त्रास दिला आहे. नाशिक मधील एका युवतीने फिर्याद दिली असता, नाशिक सायबर पोलिस स्टेशन येथे तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी लातूर येथून या विक्षिप्त तरुणास अटक केली आहे.nude Facebook call girls harassment latur boy arrested

सविस्तर वृत्त असे, शहरातील तिडके कॉलनीत रहिवासी असलेल्या सव्वीस वर्षीय युवतीस सोनल शितोळे या मुलीच्या नावे फेसबुक अकाउंटवरून अश्लिल संदेश व फोटो पाठविण्यात आले़ होते. मात्र तिने प्राथमिक खबरदारी घेत, ते अकाउंट ब्लॉक केले होते. आता पुन्हा त्रास होणार नाही असे तिला वाटले, मात्र  तिला पुन्हा सोनल जमाल मुलीच्या नावे अश्लिल मेसेज व फोटो येणे सुरू झाले़ होते. तर फेसबुक  मेसेंजरवर व्हिडीओ कॉल्सही आले होते, आधि तिने दुर्लक्ष केले मात्र अनेक कॉल पाहुणे  कॉल उचलल्यानंतर समोर एक नग्न पुरुष होता. ज्याने त्यांचे तोंड झाकले होते, तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार १५ मे पासूनच तिला सोनल शितोळे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन अश्लील मेसेज आणि फोटो येत होते.

हा सर्व प्रकार पाहून तरुणीला धक्काच बसाल. तिने तडक सायबर पोलिस स्टेशन गाठले आणि झालेला प्रकार कथन केला आणि फिर्याद दिली. पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला, सायबर पोलिसांनी तक्रारकर्त्या युवतीच्या अकाउंटवरून सोनल शितोळे (फेसबुक आयडी क्रमांक – १०००१७०१२४४६४९३) व सोनल जमाल (फेसबुक आयडी क्रमांक – १०००१६५०९७३३१४६) यांचे डिटेल्स काढले़ शोध घेतला असता लातूरच्या अवंतीनगरमधील विश्वजित जोशी याचे नाव समोर आले. मानसिक त्रास देणाºया जोशी यास ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री अनवणे, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस शिपाई कृष्णा राठोड यांना लातूरला रवाना करण्यात आले.

लातूर येथील  विश्वजित प्रकाशराव जोशी (२६, रा़ अवंतीनगर) या युवकास नाशिकच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जोशीविरोधात विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़ आहे. या तरुणास न्यायालयात हजर केले असतां त्याला शुक्रवार दि.२५ पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनोविकृत युवकाचे प्रताप

मनोविकृत तरुण विश्वजित याने जवळपास २० फेक अकाऊंट तयार केल्याचे समोर आहे. पोलिसांनी तपास केला असता त्याने जवळपास ६२८ महिलांना त्रास दिला आहे. हा तरुण फेसबुक वर आधी फ्रेंड बनवायचा मग सभ्यपणे बोलायचा, काही काळ गेला की महिलांना अश्लिल मेसेज टाकत असे, फोटो टाकत असे. हे कमी की तो फेसबुक मेसेंजर वर महिलांना व्हिडियो कॉल करत असे आणि त्यात तो संपूर्ण विवस्त्र होत असे, तर आपला चेहरा लपवत असे. असे करत तो महिलांना त्रास देत असे.

विश्वजीतचे वडिल सेवानिवृत्त झाले आहेत. मोठा भाऊ इंजिनियर आहे. आई गृहिणी आहे. पूर्ण घर शिक्षित आणि सभ्य आहे. त्याने कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक मोबाइल फोन आणि सीम कार्ड जप्त केले आहे. विश्वजीतने २० बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महाराष्ट्रातील जवळपास ६५८ महिलांचा अशा प्रकारे त्रास दिला असे तपासात निष्पन्न झाले आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.