WhatsApp आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच होईल तुमचा मोबाईल रिचार्ज

जेव्हापासून गोपनीयता धोरणावरील वाद व्हॉट्सअ‍ॅपशी जोडला गेला आहे, तेव्हापासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी आनंद देण्यासाठी नवीन अपडेट्स आणत आहे. मध्यंतरी पॉलिसी वादामुळे बर्‍याच वापरकर्त्यांनी दुसर्‍या अ‍ॅपवर स्विच केले. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला खूप त्रास सहन करावा लागला.WhatsApp

आता कंपनी आपल्या वापरकर्त्यांना परत कनेक्ट करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करीत आहे. व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) च्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅपने आता अ‍ॅपमधूनच रिचार्ज करण्याची सुविधा बनविली आहे. म्हणजेच आता व्हीआय यूजर्स थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून आपला फोन रिचार्ज करू शकतील.

WhatsApp
WhatsApp

Vi ने युझर्ससाठी आनंदाची बातमी आणली आहे. आता WhatsApp Payments वरुन Vi युझर्स रिचार्ज करू शकणार आहेत. आताच्या घडीला सध्या टेलिकॉम ऑपरेटर भारतात व्हॉटसअ‍ॅप पेमेंट द्वारे सिम रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही. व्हॉट्सअ‍ॅप भारतात कोट्यवधी लोकांच्या मोबाइलमध्ये आहे.

ते रोज मेसेज पाठवण्यासोबत व्हाइस आणि व्हिड़िओ कॉलिंग सुद्धा करीत असतात. आता व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे पैशाची देवाण घेवाण करीत आहेत. हे युजर्ससाठी खूपच सुविधाजनक बनले आहे. वोडाफोन आयडियाने युजर्ससाठी फोन सिम रिचार्ज सेवा सुरु केली आहे.

प्रीपेड युजर्सं केवळ दोन क्लिक मध्ये व्हॉट्सअॅप द्वारे आपला मोबाइल नंबर रिचार्ज करू शकतील. सध्या कोणतेही टेलिकॉम ऑपरेटर भारतात व्हॉटसअप पेमेंट द्वारे सिम रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही. भारतात कोट्यवधी लोक या सेवेचा वापर करतात.

Vi ने आणलेल्या नवीन सुविधेमुळे कोट्यवधी युझर्सना प्रीपेड रिचार्च करणे आता एकदम सोपे झाले आहे, असे सांगितले जात आहे.WhatsApp

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.