एक नव्हे दोन नव्हे तब्बल ३७ वाळू चोर ट्रक पकडले

 

नाशिक : सटाणा तहसील आणि जायखेडा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई कारवाई करत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ३७  वाळूचे चोरी  करणारे  डंपर पकडले आहेत. ही सर्वात मोठी कारवाई प्रशासनाने केली असून नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील बाळू चोरणारे यामुळे चांगलेच हादरले आहेत. तापी नदीपात्रातून ही मोठ्या प्रमाणात बाळू तस्करी सुरु होती.या पकडलेल्या कारवाईत दंडात्मक कारवाई करत चाळीस लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई होती.

खोटे आणि बनावट असे परवाने या चोरांनी छापले होते. तर ही वाळू मुख्यतः मुंबईला पाठवली जात होती. या प्रकरणात नंदुरबार , नाशिक जिल्ह्यातील वाळू चोर गुंतलेले आहेत.ही कारवाई प्रांत प्रवीण महाजन , तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड ,विनोद चव्हाण ,जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या विशेष पथकाने केली आहे. या कारवाईत  सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील करंजाड जवळ सापळा प्रशासन आणि पोलिसांनी रचला होता.

वाळूने भरलेले तब्बल ३७ डंपरचा ताफा हॉटेल शाहूच्या मैदानावर थांबल्यावर पथकाने छापा टाकला आहे.वाळूचे डंपर सटाणा तहसील आवारात जमा करून अधिकृत परवान्याची तपासणी केली आहे.या कारवाई मुळे सर्व हादरले आहेत. एका कारवाईत इतके ट्रक पकडले जातात तर किती मोठ्या प्रमाणावर चोरी होत असेल याचा अंदाज सहज लावला जाऊ शकतो.

  • एक नव्हे दोन नव्हे तब्बल ३७ वाळू चोर ट्रक पकडले
  • सटाणा तहसील आणि जायखेडा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई
  • कारवाईत दंडात्मक कारवाई करत चाळीस लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार
  • खोटे आणि बनावट असे परवाने या चोरांनी छापले
  • वाळू मुख्यतः मुंबईला पाठवली जात होती
  • नंदुरबार , नाशिक जिल्ह्यातील वाळू चोर गुंतलेले
  • तब्बल ३७ डंपरचा ताफा हॉटेल शाहूच्या मैदानावर थांबल्यावर पथकाने छापा टाकला
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.