जागावाटपावरून नाराज मात्र युती सोडणार नाही आठवले यांची माहिती

नाशिक :सेना-भाजपाची युती व्हावी  याकरिता २०१४ च्या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केले आणि कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली होती. देशात मागासवर्गीय मतांवर मोदी यांना, व राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले आहे. मात्र या २०१९ च्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जात आहोत तेव्हा मात्र  सेना-भाजपाने रिपाइंला एकही जागा दिली नाही याचे दु:ख तर  आहेच. तर  युती करताना आमचा अनुल्लेखदेखील टाळला जाणार असेल तर निवडणुकीत चांगले दृश्य दिसणार नाही. अशी नाराजी रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत एनडीए सोडणार नाही,  रिपाइंला दोन जागा मिळाव्यात यासाठी पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीसाठी सोडल्यास यापुढे राज्यसभेची जागा आपण मागणार नाही असे सांगून, रिपाइं ज्या पक्षांच्या सोबत असतो तो पक्ष सत्तेवर येत असतो हे आजवर स्पष्ट झाले आहे, याची जाणीव सर्व पक्षांना असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याला निरोप पाठविला होता. परंतु आपण वेगळा काही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुलवामा विरोधकांकडून हल्ल्याचे राजकारण

पुलवामा येथे  सीआरपीएफ जवानाच्या बसवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात कारवाई करत भारतीय  हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश – ए – मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र उद्वस्त केले, आपल्या देशाने हवाई दलाच्या कारवाईचे कौतुक केले. मात्र विरोध पक्ष या कारवाईवर शंका उपस्थित करुन राजकारण करतांना दिसत  आहेत. कारवाईवर शंका उपस्थित करणे चुकीचे आहे. अशा परिस्थिती सर्वानी एकत्र रहाणे अपेक्षित आहे असे आठवले यांनी आपले मत व्यक्त केले.

शहीद निनादला पेट्रोलपंप मिळवून देणार

बडगाम येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघातात झाला, यामध्ये नाशिक मधील स्काड्रन निनाद मांडगवने हे शहीद झाले. शुक्रवारी  दि 28 रोजी  गोदाकाठी शासकीय इतमामात निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तर शनिवारी दि. 2 सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निनादच्या घरी जाऊन कुटुंबियाशी चर्चा केली. रामदास आठवले म्हणाले की,  निनादला संरक्षण मंत्रालयाने शहीद म्हणून घोषित करण्यात यावे, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन निनाद यांच्या पत्नीस पेट्रोल पंप द्यावा अशी मागणी करणार आहे. त्याबरोबर निनादची यांची  पत्नी विजेता यांनी सैनिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  या संदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे याच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.