ylliX - Online Advertising Network

सीट बेल्टचा दंड राहिला बाजूला, चारचाकीत प्राथमिक उपचार पेटी ठेवली नाही म्हणून केला दंड !

ट्राफिक पोलिस वेळोवेळी दुचाकी आणि चारचाकी गाड्या थांबवून त्यातील कागदपत्रे, विमा आणि इतर गोष्टी पाहतात. तर सीट बेल्ट आणि इतर कोणता नियम तोडला तर दंड वसूल केला जातो. मात्र नाशिक मधील एका कारचालकाला गाडी न तपासता गाडी थांबवली म्हणून चक्क कार मध्ये प्राथमिक उपचार पेटी नाही म्हणून दंड ठोठावल आहे. हा दंड पाहून कार चालक ही बुचकळ्यात पडला आहे. सीट बेल्ट लावत नाही याबद्दल कारचालकाकडे वैद्यकीय पुरावा असून, रक्तदाबाच्या त्रासामुळे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे कार पकडली तेव्हा त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले होते.तर याबद्दल दंड भरायला तयार आहे असे सांगितले  होते. no seat belt but police fined no first aid box car car driver surprised by it    

 रात्री कार, दुचाकी  चालवताना प्रकाशाचा त्रास होतो मग हा नाईट व्हिजन चष्मा उपयोगाचा आहे. 

घटना सिटी सेन्ट्रल मॉल इथे घडली आहे. पोलिसांनी काराचालकाची कार थांबवली, इतर सर्व चौकशी केल्यावर. कोणती पावती फाडावी असा प्रश्न त्या पोलिस कर्मचाऱ्यांना पडला. मग आता कार तर थांबवली तर त्यांना दंड झाला पाहिजे. मग काय ऑनलाईन पावती भरायला सांगितले. जेव्हा चालकाने दंड भरला तर त्यावर कारमध्ये प्राथमिक उपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स नाही म्हणून दंड ठोठावला होता. कोणतीही चूक नसतांना पोलिसांनी २०० रु. दंड वसूल केला असा आरोप कार चालक करत आहे. तर असे दंड करणार असतील तर देशात एकही कार रस्त्यावर दिसणार नाही. नियमावर बोट ठेवला तर मग हजारो नियम निघतील असे कारचालक मत व्यक्त करत आहेत. तर सीट बेल्टचा दंड का वसूल केला नाही असा प्रश्न विचारत आहे.no seat belt but police fined no first aid box car car driver surprised by it    

कार घरी स्वच्छ करणार आहात मग हे प्रेशर पंप तुमच्या साठी आहे.

सीट बेल्टची पावती नाही तर प्राथमिक उपचार पेटी ची पावती

प्रतिक्रिया :

” मी सिटी सेन्ट्रल मॉल येथून जाताना मला पकडले, माझी कोणतीही चूक नव्हती तर सर्व कागद पत्र आणि इतर गोष्टी पूर्ण होत्या, तरीही मला पावती देत दंड भरायला लावला आहे. आता आम्ही कार चालवताना प्राथमिक उपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स घेवून फिरायचा आहे का ?  नियम आणि   कायदा पाळतो म्हणून आम्ही पोलिसांनी   केलेला दंड भरला आहे. पुन्हा हा मानसिक आणि आर्थिक त्रास होणार आहे का, कार मध्ये बेल्ट लावला नाही म्हणून दंड भरायला सांगितले मात्र हा विषय सोडून भलताच दंड घेतला आहे.त्यामुळे संताप होतो आहे. ?”

– योगेश क्षीरसागर ,कारचालक,नागरिक.

no seat belt but police fined no first aid box car car driver surprised by it    
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.