ylliX - Online Advertising Network

सरकार स्थिर असून, राणे लवकरच मंत्री होतील- गिरीश बापट

नाशिक : राज्य सरकार स्थिर आहे. कोणी सोडून गेले तरी सरकारला काहीच होणार असून आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार आहोत. तर उद्धव ठाकरे यांना काही वाटले तर ते सरळ मुख्यमंत्र्या सोबत बोलतात त्यामुळे अशी कोणतीही अडचण नाही असे गिरीश बापट यांनी पत्रकारांसोबत बोलतांना सांगितले आहे.  

नारायण राणे यांच्यावर प्रश्न विचारला असता बापट म्हणाले की राणे यांचा लवकर मंत्री म्हणून शपतविधी होणार असून त्यांचा समवेश सरकारमध्ये होणार आहे. त्यामुळे ते आले आणि सरकार अस्थिर होणार असे बिलकुल नाही , सरकार पण टिकेल आणि नारायण राणे मंत्री सुद्धा होणार आहे.गिरीश बापट शेतकरी कर्जमाफीवर बोबले की  मागील कर्जमाफीचे पैसे 18 महिन्यांनी मिळाले होते. फालतू लोकांनी पैसे लाटू नये ही आमची इच्छा म्हणून कर्जमाफीला उशीर झाला असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गिरीश बापट यांची राज ठाकरे भेट

राज ठाकरे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे दौऱ्यावर आहे. याचवेळी गिरीश बापट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी पुणे येथे झालेल्या आंदोलनात ५० कार्यकर्ते पोलिसांनी पकडले असून तुम्ही त्यात लक्ष द्या असे सागितले.

यावर बापट यांनी माध्यमांना सांगितले की त्या कार्यकर्त्यांना जमीन मिळाला नसून त्यांना उच्च न्यालयात अर्ज केला आहे. जामीन नाही म्हणून ते बाहेर नाहीत. जेव्हा सरकार दरबारी ही गोष्ट येईल तेव्हा निर्णय घेवू सध्या हे सर्व न्यायलयात आहे. त्यामुळे अधिक भाष्य करता येणार नाही. या चर्चेनंतर, गिरीश बापट यांनी आपली राज यांचेशी ३५ वर्षांपासूनची मैत्री असून त्यांचा मी सल्ला घेत असतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.