ylliX - Online Advertising Network

भिडे यांना मनपाची नोटीस, आंबा खाल्याने झालेल्या अपत्यांची आणि दाम्पत्यांची नावे दया

नाशिक : आरोग्य सहसंचालकांच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भिडे यांना नोटीस बजावली आहे. या नुसार मनपाने नोटीस दिली असून  या नुसार भिडे यांनी उल्लेख केलेली आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत, याबाबत सविस्तर खुलावा करण्यास सांगितले असून, त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांना आंबा दिल्याने मुलगा झाला अशा सर्व दाम्पत्याचे नाव आणि पत्त्यानिशी माहिती आपल्या खुलाशात नमूद करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप या नोटीसीला कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही.

शिवप्रतिष्ठानचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये १० जून रोजी एका मेळाव्यात आंबे खाल्याने पुत्र प्राप्ती होते या आशयाचे कथित वादग्रस्त विधान केले होते. भिडे म्हणाले होते की त्यांच्या शेतातील आंबे १८० जणांना दिले. त्यातील १५० जणांना मुले झाले आहेत असा अजब दावा त्यांनी केला होता. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भिडे यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने १८ जून रोजी नोटीस बजावली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.