ylliX - Online Advertising Network

रात्रपाळीतील साफसफाई रद्द, वार्षिक ६ कोटींची होणार बचत

देयके न काढण्याचे आयुक्तांचे आदेश

धडाकेबाज निर्णयांचा धडाका लावणाऱ्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या पैशांची बचत करणारा आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रात्रीच्यावेळी होणारी साफसफाई बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. म्हणजेच सफाई कर्मचाऱ्यांची रात्रपाळी आता बंद होणार आहे. NMC commissioner Tukaram Mundhe cancels night cleanliness 6crores annual savings

नाशिक महानगर पालिकेच्या रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना दुप्पट मेहनताना द्यावा लागत होता. आता तो द्यावा लागणार नाही. त्यामुळे महापालिकेचे वर्षाकाठी तब्बल सहा कोटी रुपयांची बचत होणार आहे.

रात्रपाळीचे सफाई कर्मचारी कामचुकारपणा करतात. कामात दिरंगाई करतात अशी अनेक नगरसेवकांची तक्रार होती. भाजप नगरसेवक तथा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी ही रात्रपाळी बंद करण्याची मागणी केली होती.

मुंढे यांचा मनपा कर्मचारी वर्गाला दणका : २५० कर्मचारी मूळ सेवेत रुजू

एकूण ३५० सफाई कर्मचारी रात्रपाळीत काम करत होते. त्याचा मोबदला म्हणून दरमहा ५० लाख याप्रमाणे महापालिकेचा अतिरिक्त ६ कोटी रुपये खर्च होत होता. रात्रपाळीचे कर्मचारी फक्त कागदावर हजेरी लावून कामात दिरंगाई करत होते. या बाबीचे अवलोकन होताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला.

आता या सफाई कर्मचाऱ्यांना दिवसभरात दोन शिफ्ट मध्ये काम करावे लागणार आहे. सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास असे त्यांचे कामाचे स्वरूप असणार आहे.

या निर्णयाला मात्र मेघवाळ आणि वाल्मिकी मेहतर संघर्ष समितीने विरोध दर्शवला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा असे निवेदन समिती मार्फत आयुक्तांना देण्यात येणार आहे.

NMC commissioner Tukaram Mundhe cancels night cleanliness 6crores annual savings

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.