आयुक्त मुंढे यांनी निकाली काढला १०३ वर्षे जुना दावा, दिला  मृत्यूचा दाखला  

नाशिक : सरकारी अनागोंदी आणि कामातील दिरंगाईमुळे अनेकदा सामान्य माणसाचे मोठे नुकसान होते. त्यातही सरकारी दिरंगाई किती असावी, तर तब्बल १०३ वर्षे. आसाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.nmc commissioner solve 103 years case gives death certificate

मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी नाही तब्बल 103 वर्ष वाट पहावी लागणार आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे 103 वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली निघाले आहे.सविस्तर प्रकरण असे की, जुने नाशिक परिसरात निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांचा 5 फेब्रुवारी 1915 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा आपल्या देशात ब्रिटीश सत्ता होती.

पिरजादे यांचा मृत्यूचा  दाखला तेव्हा सरकारी भाषेनुसार मोडी लिपीत लिहिण्यात आला होता. मग आपला देश स्वतंत्र झाला आणि  नाशिक नगरपालिकेची महापालिका झाली.मात्र काही कारणांनी मृत्यूचा दाखला मिळत नव्हता. ब्रिटीशकालीन दाखले मोडी लिपीत असल्याने, कधी मोडी लिपी वाचक नाही तर कधी अधिकारी नाही अशी वेगवेगळी कारण सांगून अर्जदाराला नेहमी टाळले जात होते.मग आयुक्त तुकाराम मुंढे  विविध मार्गाने नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतात आणि कारवाई करतात हे पाहून त्यांच्या कडे ही तक्रार गेली. आयुक्तांनी यावर त्वरित कारवाई करत 103 वर्षांनी निजामुद्दीन पिरजादा यांच्या मृत्यूचा दाखला त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.

दिनांक -05/02/1915 रोजी मयत झालेले सयद निजाम यांचा१०३ वर्षा पूर्वीचा मोडी लिपीतील मृत्यु दाखला मराठी भाषांतरीत करून आप्तेष्टांना मनपा आयुक्त मा.तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात  आला आहे.

त्यांच्या कुटुंबीयानुसार निजामुद्दीन नजरअली पिरजादा स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता, दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या नावाने ताम्रपत्र सरकारकडून मिळावे अशी मागणी ते करत आहेत.नाशिक महापालिकेच्या रेकॉर्ड रुममध्ये 1879 पासूनच्या नोंदी आहेत. 1897 ते 1934-35 पर्यंतच्या हजारो जन्म-मृत्यूच्या नोंदी मोडी लिपीत आहेत. त्याचं वाचन करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मध्यंतरी ही जागा रिक्त असल्याने दाखल्यांची काम रखडली होती. मोडी लिपीचं वाचन करुन त्याचं मराठीत भाषांतर केलं जातं. मृत्यूचे कारण, वय, पुरुष अथवा स्त्री अशी सर्व नोंद त्या काळापासून केली जात आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi Your Name and city  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.