आयुक्त मुंढे यांच्या बदलीची चर्चा; राजकीय दबाव! नाशिककर पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात

नाशिक : आपल्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीने नेहमी चर्चेत असलेल्या नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची शहरात जोरदार चर्चा आहे. याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. Nmc commissioner Mundhe transfer

सोशल मिडीयावर एक मेसेज व्हायरल झाला असून त्यामध्ये उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नवे आयुक्त म्हणून रूजू होत असल्याच्या चर्चा आहे. याबाबत मुंढे यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.

या घटनाक्रमांना अनेक राजकीय पार्श्वभूमी असून या दबावातूनच मुंढे यांची बदली झाल्याची नाशिककरांची भावना आहे. अनेकवेळा नाशिक मनपा सत्ताधारी भाजप आणि विरोधकांची ‘नाळ’ मुंढे विरोधावर जुळली असल्याचे अनेकवेळा नाशिकरांसमोर आले. भाजपच्या नगरसेवकांची एक लॉबी यामागे कार्यरत असल्याचे चर्चेत आहे. Nmc commissioner Mundhe transfer

मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात आता नाशिककर आंदोलनाच्या पवित्र्यात असून लवकरच याबाबत ‘आम्ही नाशिककर’ तर्फे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राधाकृष्ण गमे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. गमे यांनी नाशिक मनपा आयुक्त म्हणून रुजू होण्यास होकार दिल्याचे कळते.

मुंढे यांच्या बदलीची चर्चा असताना गमे यांच्या सोबत अश्विनी जोशी यांचेही नाव नाशिक मनपा आयुक्त पदासाठी सोशल साईट्सवर चर्चेत होते. अधिकारी म्हणून अश्विनी जोशी अधिक कडक शिस्तीच्या म्हणून ओळखल्या जातात.

दरम्यान, या निर्णयाला मुंढे यांनी आव्हान दिले तरच त्यांची बदली रद्द होऊ शकते.

Nmc commissioner Mundhe transfer
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.