ylliX - Online Advertising Network

आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात विशेष महासभा, अविश्वास ठराव, सप्टेंबर  दि.१ रोजी  विशेष महासभा

नाशिक : मनपा आयुक्त त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. मात्र अनेक ठिकाणी त्यांच्या सोबत वाद आता नाशिक मनपात सुद्धा सुरु झाले आहेत. यावेळी आता महासभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी तयार केले पत्र सोमवारी (दि.२७) स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे. महापौरांनी येत्या शनिवारी सप्टेंबर  दि.१ रोजी  विशेष महासभा बोलावली आहे.Nmc commissioner facing confidence motion corporators against Nashik 

महापौर रंजना भानसी यांनी माध्यमांना सागितले की,  आयुक्त मुंढे हे एकतर्फी निर्णय घेतात, तर  मनमानी कामे करतात, ते करत असलेल्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले गेले आहेत. स्थायी सतिीच्या सर्व पक्षीय सदस्यांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.Nmc commissioner facing confidence motion corporators against Nashik 

तर दुसरीकडे मनसे, शिवसेनेने देखील मुंढे विरोधात भूमिका घेतली आहे. लादलेली करवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे.  मात्र राष्टवादी कॉँग्रेसने भाजपा-शिवसेना विरोधी भूमिका घेतली असून माजी खासदार समीर भूजबळ यांनी भाजपा अविश्वास ठरावाच्या माध्मयातून जनतेची दिशाभूल करीत असल्याची आरोप केला आहे.  या ठरावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा  पाठींबा नाही असे स्पष्ट केले आहे.Nmc commissioner facing confidence motion corporators against Nashik 

भाजपा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या लेटरहेडवर  नगरसचिवांना सोमवारी (दि.२७) सदस्य सहीचे पत्र दिले आहे. यामध्ये मुंढे यांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत.  पदाधिकारी , नगरसेवक सदस्यांचा अवमान करणे, महासभा व स्थायी समितीच्या अधिकार वापरू न देणे, नागरी सुविधांबाबत अकार्यक्षमता, हेकेखोर, मनमानी पध्दतीने काम करणे , हुकूमशाही पध्दतीने काम करणे, स्थायी समितीस गैरहजर राहणे , महासभेच्या निर्णयला न जुमानता करवाढ लागू करणे असे आरोप आहेत. मुंढे यांच्या विरोधात अनेकदा पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या मात्र त्यात काही विशेष नसल्याने दोघांनी कोणताही निर्णय घेतला नाही. शहरातील विकास, बस सेवा, स्मार्ट सिटी, रुग्ण सेवा, रस्ते इत्यादी चांगले व्हावे असे असल्याने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मुद्दाम मुंढे यांची नाशिकला बदली केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याने त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निणर्य घेतात यावर सर्व अवलंबून आहे.

सोशल मिडीयावर #wewantmundhe

मात्र दुसरीकडे नागरिक संतापले आहे. नागरी कामे, कचरा प्रश्न, २४ तास पाणी, रस्ते, नियोजित बस सेवा, स्मार्ट सिटीत निवड व केंद्राचा निधी अश्या अनेक गोष्टी मुंढे यांनी नियमित केल्या आहेत. तर मनपात वेळेवर न येणारे अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लावले आहे. त्यामुळे जर अधिकारी चांगले काम करतोय तर त्याला विरोध का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.   सोशल मिडीयावर #wewantmundhe  अशी चळवळ सुरु केली आहे.

Nmc commissioner facing confidence motion corporators against Nashik 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.