राष्ट्रवादीच्या मुंडे यांना आदर्श आमदार पुरस्कार, सत्तधारी भाजपाने वसंत व्याख्यानमालेचे अनुदान थांबवले

नाशिक : राजकीय विरोध किती थराला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण नाशिकमध्ये दिसून आले आहे. शेकडो वर्ष परंपरा जपणारे सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला होता, त्या कारणाने वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले असे उघड झाले आहे. महापालिका ही  भाजपाच्या ताब्यात असून याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सार्वजनिक वाचनालय तर्फे  १६ वर्षांपासून कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातोय, यामध्ये माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ नेर्लीकर दांपत्य यांच्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण केले जाते. तर यासाठी वेगळी अशी निवड समिती सुद्धा असते, निवड समिती जो आमदार निवडेल त्याला हा प्रतिष्ठा जपणारा पुरस्कार दिला जातो.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना यावर्षी  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र मुंडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता, असा खेद वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी जाहीर समारंभातच व्यक्त केला आहे तर वाचनालयाचे कार्यवाह असलेले श्रीकांत बेणी हे वसंत व्याख्यानमालेचेही अध्यक्ष असल्याने व्याख्यानमालेचे अनुदान देऊ नये, यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचे वरिष्ठ अधिकारी बोलत आहेत. या संदर्भात बेणी यांनी आयुक्तांना पत्र दिले असून अनुदान रोखणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

आ.हेमंत टकले, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ.नेर्लीकर दाम्पत्य यांच्या निवड समितीने मुंडे यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून कै. लिमये यांच्या कन्या शोभाताई नेर्लीकर, जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो.

विशेष म्हणजे हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, शोभाताई फडणवीस आदींना देखील दिला गेला आहे.

या आगोदर मागील सोळा वर्षांत आमदार बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर,शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावीत, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, डॉ. निलम गो-हे आणि गिरीश महाजन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

वसंत व्याख्यानमाला, नाशिक या संस्थेच्या ९७ व्या वर्षापासून देशातील आणि राज्यातील दिग्गज वक्ते यामध्ये हजेरी लावत असून नाशिकच्या सांस्कृतिक ओळख यामुळे निर्माण झाली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.