ylliX - Online Advertising Network

निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर

दुपारी कडक ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे  रविवारी शहर व परिसरातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाल्यामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.हाती आलेले द्राक्ष आणि कांदा यांचेवर ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट दाटले आहे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरणाचे मळभ दाटल्याने द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना अस्वस्थ केले आहे. वातावरणात अचानक होणारे बदल पिकाची परीक्षा पाहणारे ठरतात.

निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर झाला असून अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने इथला शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रविवारी दुपारी तालुक्यातील अनेक भागात जोरदार हवा आणि पाऊस झाला असून या अवकाळीने सर्वात जास्त नुकसान द्राक्ष बागांचे ,कांद्याचे होणार असून शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे.

आहोरात्र काबाड कष्ट करून जोपासलेली शेतशिवारे अवकाळी पावसात उध्वस्त होत असल्याने बळीराजाच्या मेहनतीवर वरवंटा फिरला असून हातातोंडाशी आलेला घास लहरी निसर्ग हिरावून घेत असल्याने बळीराजा अवकाळी पाऊस व गारपीटीच्या थैमानापुढे हतबल झाल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या तीन /चार वर्षपासून निसर्ग असाच कित्ता गिरवत असल्याने जगाच्या पोशिंद्यासमोर उभे ठाकलेले हे अस्मानी संकट अधिक गहरे होताना दिसत आहे. शेतकरी म्हणून जगतांना जगण्याच्या असह्य होत चाललेय वेदनेवर ज्याने फुंकर घालायची तेच आभाळ साता जन्माच वैर काढव असं वागत असल्याने आता जगण्याची असहाय्य होत चाललेली कैफियत मांडायची तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली शेतपीके अवकाळी पावसात जमीनदोस्त झाल्याने कष्टकरी शेतकऱ्याच्या डोळ्यातूनही आसवांचा पाऊस पडतोय.

धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जगाच्या पोशिन्द्याच्या मेहनतीवर पाणी फेरालय. सरकार देत असलेली मदत तुटपुंजी असून आता बँका, सरकारी, निमसरकारी संस्था, सोसायट्या यांच्याकडून शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसे फेडायचे यांची चिंता आता शेतकऱ्यांना सतावते आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही वर्षभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीट होत असून त्याचा इथल्या शेती उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे. निर्यातक्षम द्राक्ष, दर्जेदार कांदा, डाळींब आदि पिकांचे उत्पादन घेण्यात व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक शेती जोपासण्याकडे कल असलेल्या निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला या आस्मानी संकटामुळे जबरदस्त हादरा बसला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.