ylliX - Online Advertising Network

निफाड @ ९ अंश सेल्सिअस राज्यात सर्वाधिक कमी तपमान नोंद

 

नाशिकमध्ये आता दिवसेंदिवस थंडीत वाढ होत चालेली आहे. सोमवारी सकाळी १०.२ तापमान अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे. तर निफाडमध्ये पारा घसरून ९ अंश सेल्सिअसवर आला असून राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद येथे झाली आहे . पुढील काही दिवसात अजून तापमानात घसरण होऊन थंडी वाढू शकते असा तज्ज्ञांचे मत आहे.

काही दिवसापासून नाशिकमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तपमान कमी होण्यास सुरुवात झाली होती.तर सुरवातीला  १३ अंश सेल्सिअस ते आज नाशिक मध्ये १०.२ डिग्री सेल्सिअसचे तपमान नोंद झाली आहे. संपूर्ण राज्यात नेहमी प्रमाणे निफाड येथे तपमान कमी असते यावेळी सुद्धा तपमान कमी होत असून ९ डिग्री सेल्सिअस तपमान नोंदविले गेले आहे. मागच्या वर्षी निफाड येथे २ डिग्री तपमान होते.

दिवाळी संपताच यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमानची नोंद झाली आहे. वातावरणातील हा गारवा दिवसभर जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे गारठलेल्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक देखील सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. शहरात पहाटेच्या सुमारास धुके देखील पसरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर काही भागात युवक रस्त्याच्या बाजूला शेकोटी पेटून थंडी पासून बचाव करताना दिसून आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.