ylliX - Online Advertising Network

nia raid Malegaon मालेगाव सह देशात PFI विरुद्ध NIAची धडाकेबाज कारवाई

NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या  (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. nia raid Malegaon

Popular Front of Indiaपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) कार्यालयावर देशभरात छापेमारीच्या घटना समोर येत असून आज पहाटे 3 वाजता मालेगाव मध्ये सुद्धा एटीएस टीमने सैफी रहमान याला ताब्यात घेतले. मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटने कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोंडवा भागातील PFI कार्यलयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे.  एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.  त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.  पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.

एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएला मोठ्या प्रमाणात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्याआधारावर तपास यंत्रणांनी ही व्यापक कारवाई केली. १० हून अधिक राज्यांमध्ये ईडी, एनआयए आणि पोलिसांनी १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. पीएफआयशी संबंधित लोकांच्या प्रशिक्षणाच्या हालचाली, टेरर फंडिंग आणि लोकांना संघटनेशी जोडण्याविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

दिल्लीतील शाहीन बाग आणि गाझीपूर येथून पीएफआयशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय लखनौमधील इंदिरानगर येथूनही दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनीही राज्यातून पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, एनआयएच्या कारवाईविरोधात पीएफआयने प्रतिक्रिया दिली असून, संघटनेचे सरचिटणीस अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, फॅसिस्ट सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे. सरकारकडून करण्यात येत असलेल्य अत्याचारांचं ताजं उदाहरण रात्री पाहायला मिळालं. केंद्रीय यंत्रणांनी लोकप्रिय नेत्यांच्या घरावर छापेमारी केली. विरोधी आवाज दाबण्यासाठी फॅसिस्ट सरकारकडून करण्यात येत असलेल्या कृत्याचा विरोध करा.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले.

मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (153 अ, 121 अ, 109, 120 ब) आणि यूएपीए कलम 13(1) (ब) मध्ये अंतर्गत गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

राज्यात कोणत्या जिल्ह्यात कारवाई सुरू

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे. आणखी काही जिल्ह्यांमध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे. 

देशभरातही छापेमारी

एनआयए, ईडीसह स्थानिक तपास यंत्रणांकडून देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. केरळमध्येच 50 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापेमारी सुरू आहे. काही राज्यांमध्ये पीएफआयचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे.

============================

The National Investigation Agency and Enforcement Directorate on Thursday morning arrested over 100 activists of extremist Islamic organisation Popular Front of India, including its top leaders, during nationwide raids carried out in several states.
Union Home Minister Amit Shah on Thursday chaired a high-level meeting wherein the ongoing searches at premises linked to the Popular Front of India and action against terror suspects, were believed to have been discussed, officials said.

nia raid Malegaon, nia raid nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.