कल्याण ते नाशिक दरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी म्हणून गेल्या वर्षी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सब अर्बनची मर्यादा वाढविल्यास कल्याण ते कसाराच नाही तर कल्याण ते नाशिक लोकल प्रवास अशी मेमू रेल्वे सेवा सुरू करणं शक्य होईल. ही लोकल सुरू केली तर दळण-वळण वाढून ग्रामीण भागांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असे गोडसे यांनी रेल्वे मंत्र्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचं नाशिककरांचं स्वप्न यंदा पूर्ण होऊ शकते. कारण डिसेंबरमध्ये नाशिक-कल्याण दरम्यान मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.kalyan to nashik local train
सध्या नाशिक ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस सारख्या रेल्वे आहेत. मात्र आता ही लोकल सुरू झाल्यास याचा फायदा व्यावसायिकांसह शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, चाकरमान्यांना देखील होणार आहे. गेल्या लोकसभेदरम्यान, नाशिक-कल्याण मेमू लोकल रेल्वे सेवेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. नाशिक-कल्याण लोकलसाठी खासदार हेमंत गोडसे यांची अनेक वर्षांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात मेमू लोकल धावणार
गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने नाशिक-कल्याण दरम्यान लोकल सेवेला मान्यता दिली होती. चेन्नई कारखान्यातून मुंबईतील इमू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) प्रकारची ३५ कोटींची लोकल दीड वर्षापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये दाखलही झाली होती. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, १५ किलोमीटरच्या कसारा घाटात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वर्षभरापासून लोकलची चाचणीच झाली नव्हती. परंतु आता पुढील महिन्यात या मेमू लोकलची चाचणी करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्यास नव्या वर्षात नाशिक ते कल्याण या मार्गावरचा सुखकर होणार हे नक्की…
वंदे मातरमची चर्चाच
नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत सार्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची सार्यांना उत्सुकता आहे.

नाशिकहून मुंबईला या गाड्या
नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आहेत. जानेवारीपासून गाडी सुरू झाली तर त्यात नाशिक-कल्याण मेमू लोकलची भर पडणार आहे. 1 नोव्हेंबर 1975 रोजी नाशिकरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. या गाडीने नाशिकच्या सर्वांगिण विकासात मोठी भर घातली. या गाडीने रोज जवळपास 1000 जण प्रवास करतात.
सध्या सीएसएमटी स्थानक ते नाशिक अशी लोकल सेवा सलग नसून, त्याऐवजी सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते नाशिक व पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत एवढा लांबचा पल्ला गाठण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नाही. १५० किमीपर्यंतच लोकल सेवा उपलब्ध असते. त्यापुढील अंतर कापण्यासाठी शौचालय, बाथरूम व इतर सुविधांची पूर्तता लोकलमध्ये करावी लागते. सध्यातरी लोकलमध्ये या सुविधा नाहीत. त्यामुळे सीएसएमटी ते नाशिक आणि पुणे अशा सलग लोकल प्रवासाऐवजी कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अशी लोकल सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सर्व स्थानकांवर थांबा
सीएसएमटी ते पुणे दरम्यानचे रेल्वे अंतर १९२ किमी तर सीएसएमटी ते नाशिक दरम्यानचे रेल्वे अंतर १७२ किमी आहे. मुंबई ते नाशिक आणि मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी ३ ते ३.३० तासांचा अवधी लागणार.कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अंतर कापण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार.नाशिक आणि पुणे दरम्यान सर्व स्थानकांवर लोकलला मिळणार थांबा.kalyan to nashik local train