ylliX - Online Advertising Network

मराठीतील नव कवींना दिशा देण्याची गरज – डॉ. आशुतोष जावडेकर

नवी दिल्ली : मराठी कविता ही आशय संपन्न असून तिने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. त्यामुळे मराठी कवितेची दशा योग्य आहे मात्र, नव कवींना दिशा देण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कवी व गायक डॉ.आशुतोष जावडेकर यांनी आज महाराष्ट्र महोत्सवात व्यक्त केले. New Marathi Poets Direction Poems Maharashtra Mahotsav Delhi Aashutosh Jawadekar

येथील कस्तुरबा गांधी ‍मार्ग ‍ स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमीत्त ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘मराठी कवितेची दशा व दिशा’ या विषयावर विचार मांडताना डॉ. जावडेकर बोलत होते. New Marathi Poets Direction Poems Maharashtra Mahotsav Delhi Aashutosh Jawadekar

New Marathi Poets Direction Poems Maharashtra Mahotsav Delhi Aashutosh Jawadekar, मराठीतील नव कवींना दिशा देण्याची गरज डॉ. आशुतोष जावडेकर मराठी कविता आशय संपन्न वाचन पुस्तके काव्यसंग्रह दर्जा Marathi poetry intensive reading books poetry collection महाराष्ट्र महोत्सव नवी दिल्ली nashikonweb nashik on web

कविता हे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम अूसन कविता ही त्या-त्या भाषेच्या भावविश्वाचा कळस असते. मराठी भाषेला कवितेची दिर्घ परंपरा आहे. मराठी कवितांनी अनेक पिढ्या घडविल्या, असे डॉ.जावडेकर म्हणाले. कविता ही अर्थकारण व समाजकारण आदीचे अदृयष्य कंगोरे घेऊन वाचकांपुढे येते. ही दिर्घपरंपरा मराठी कवितांनी जपली आहे. युवा कवीही सध्या मराठी भाषेत काव्य लिखाण करीत आहेत. मात्र, आजच्या पिढीतील कविंच्या कविता एकसुरी होत असल्याचे चित्र आहे. या कविंनी समाजभान राखत रचना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेतील अभिजात कविता, रंगमंचीय कविता, समजुतीच्या कविता, ॲटीट्यूडच्या कविता आदी प्रकारांवर डॉ. जावडेकर यांनी विश्लेषण केले. कवितेत छंदाचे महत्व पटवून देताना त्यांनी प्रसिद्ध कवी वसंत बापट रचित ‘मुंबईच्या मणकर्णीके नेसूनी फिके वसन गहीना…’ ही लावणी सादर केली. तसेच, प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे व सुनिता देशपांडे यांनी वाचन केलेल्या कविश्रेष्ठ बा.भ.बोरकर यांच्या ‘सरीवर सरी आल्या ग’ या कवितेतील सोंदर्यस्थळे उलगडून दाखविणारी ध्वनी चित्रफीत सादर केली. डॉ.जावडेकर यांनी स्वरबद्ध व संगीतबद्ध केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या ‘तूज मज नाही भेद केला सहज विनोद’ या अभंगाच्या ध्वनीचित्रफित सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्र महोत्सवात रंगली काव्य मैफील

सकाळच्या सत्रात दिल्लीतील कविंची महाराष्ट्र महोत्सवात काव्य मैफील रंगली. डॉ.ज्ञानेश्वर मुळे, जीवन तळेगावकर, संदीप बोबडे, अश्विनी महाजन आणि डॉ.बाळकृष्ण मातापूरकर या कविंनी यावेळी कविता सादर केल्या. New Marathi Poets Direction Poems Maharashtra Mahotsav Delhi Aashutosh Jawadekar

संदीप बोबडे यांनी, नोकरी निमित्त महाराष्ट्र सोडून दिल्लीत आलेल्या मराठी माणसांच्या मनाची घालमेल मांडणारी ‘पुढचे पाऊल’ ही अष्टाकारातील कविता सादर केली. जागतिकीकरणात माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारी ‘संध्याकाळ –उद्या’ ही वेगळ्या धाटणीची कविता सादर करून जीवन तळेगावकर यांनी उपस्थितांच्या टाळया मिळविल्या. दिल्लीतील रस्त्यांवरील ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या माणसांची व्यथा मांडणाऱ्या डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘अजून मनाला कळले नाही कोण कुणाला देतो भुंगा…’ या कवितेने उपस्थितांना स्तिमित केले.

New Marathi Poets Direction Poems Maharashtra Mahotsav Delhi Aashutosh Jawadekar

Read More News From NashikOnWeb. Follow Us On Social Media.

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.