न्यू ग्रेस अकॅडमीत स्पोर्ट्स डे उत्साहात

नाशिक : न्यू ग्रेस अकॅडमी शाळेत शनिवारी (दि. १६) रोजी क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात मुलांमध्ये सांघिक समज यावी यासाठी भर देत कबड्डी, बास्केटबॉल, खो-खो अशा खेळांना प्राधान्य देण्याची योजना करण्यात आली. प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय अॅथलिट खेळाडू मोनिका आथरे व तिचे प्रशिक्षक एस. एन. काळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. new grace academy nashik sports day celebration 2019

यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत संचालन तसेच रिबन डान्स सादर केले. प्री आणि प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चमचा लिंबू, धावणे, सॅक स्पर्धा, तीन पायांची शर्यत अश्या विविध स्पर्धांत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल या सांघिक प्रकारातील खेळांत विजयी संघांना ढाल आणि प्रशस्तीपत्रक देत गौरविण्यात आले.

यावेळी मोनिका आथरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाली की, कठीण परिस्थितीतून मात करत इथपर्यंत पोहचली असून आयुष्यात यशाला गवसणी घालायची असेल तर जिद्द आणि चिकाटी महत्वाची आहे. खेळात करिअर करण्याची खूप मोठी संधी असून विद्यार्थ्यांना शाळेकडे सोपवून पालकांनी निश्चिंत राहावे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या संस्थापिका रोहिणी नायडू, अध्यक्षा राजश्री सुरावकर, सचिव नागराजन नायडू, सहसचिव राजेंद्र वानखेडे, संदीप सुरावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका हिना शेख व शिक्षकवृंद उपस्थित होता.

new grace academy nashik sports day celebration 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.