ylliX - Online Advertising Network

जिल्हा बँकेकडून पीक कर्जासाठी उद्धव ठाकरेंना साकडे

कृषी अधिवेशनादरम्यान ठाकरेंना भेटणार
नाशिक : आगामी हंगामासाठी कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यावर मध्यात अडकण्याची नामुष्की आल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. मार्च महिन्यात कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध झाले नाही. जिल्हा बँकेतर्फे दुसऱ्या कर्जाला पात्र होण्यासाठी दुसरे कर्ज घेऊन कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात आंदोलनही केले होते.
कर्ज उपलब्ध करून घ्यावे या मागणीसाठी जिल्हा विविध विकास कार्यकारी संस्था संघटना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साकडे घालणार आहे.
बुधवारी जिल्हा बँकेच्या मुख्यालयाच्या आवारातच घेण्यात आलेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गायधनी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात जिल्हा बँकेचा निषेध करण्यात आला.

शेतकरी पीककर्ज जिल्हा बँक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी


जिल्हा बँकेचा गोंधळ थांबून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा बँक संचालकांनी मुख्यमंत्रांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. सहकार मंत्रीही यासाठी उत्सुक दिसत नाही. सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवा असे असताना उद्धव ठाकरेही शेतकरी प्रश्नावर मैदानात उतरले आहेत. याच अंतर्गत १९ मे रोजी कृषी अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. शेतकरी आणि खातेदारांची कुचंबना थांबून हा गुन्हा करणाऱ्यांना जबर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांनीही याप्रश्नी शेतकऱ्यांना वेळ दिला आहे. शेतकऱ्यांना याविषयी मत मांडता येणार आहे.
बैठकीस फेडरेशनचे संस्थापक राजू देसले, उत्तम खांडबहाले, सुरेश रायते, व्ही. डी. धनवटे, प्रभाकर खरोटे, नामदेव बोराडे, बाबाजी रायते, बापू राजोळे, पोपट राजोळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.