NCP MLA Pawar Missing राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार हरवल्याची पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार

NCP MLA Pawar Missing

नाशिक : जिल्ह्यातील कळवणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार हरवल्याची तक्रार शहर पोलिसांच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र हृषीकेश पवार यांच्या तक्रारीची शनिवारी (दि. 23) रोजी रात्री उशिरा नोंद करण्यात आली.

महाराष्ट्रात शनिवारी भल्या सकाळी घडलेल्या सत्तानाट्य घडले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधिवेळी नाशिक जिल्ह्यातील तीन आमदार उपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते. यात नरहरी झिरवाळ (दिंडोरी), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर) यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार या नितीन पवार नेमके कुठे आहेत याबाबत अनभिज्ञता असल्या तरी त्यांनी ते पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. आज रात्री उशिरा नितीन पवार यांचे पुत्र ऋषिकेश पवार यांनी पंचवटी पोलीस स्टेशनला आपले वडील हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

Hruahikesh Pawar

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शनिवारी सकाळी साडे सहा वाजता मुंबई येथे पक्षाच्या बैठकीसाठी जातो असे सांगून घरातून निघालेले पवार अजूनही घरी परतले नाहीत. तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दिंडोरीचे निष्ठावान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंबीयांनीही ते हरविल्याची तक्रार रात्री उशिरा पोलिसांकडे केली.

शपथविधिला उपस्थित राहिल्याबद्दल खुलासा करताना आमदार दिलीप बनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षासोबत असल्याचे सांगितले असले तरी नेमक्या कोणत्या पवारांसोबत आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. नितीन पवार आणि माणिकराव कोकाटे यांनी सोशल माध्यमाचा वापर करत पक्षासोबतच असल्याचे सांगितले मात्र संध्याकाळी झालेल्या वायबी चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीला वरील चारही आमदारांनी दांडी मारली. हे सर्व अजित पवारांसोबत आहेत असा संशय व्यक्त केला जातोय.

देवळालीच्या राष्ट्रवादी आमदार सरोज अहिरे यांनीही आपण शरद पवार आणि पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. सायंकाळी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला त्या हजर होत्या.

NCP MLA Pawar Missing

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.