ylliX - Online Advertising Network

खासदार शरदचंद्र पवार यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव

संविधानाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पुणे महात्मा जोतिबा फुलेछत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले समतेचे विचार संविधानात अंतर्भूत असून संविधान हे भारताच्या लोकशाही धर्माची गीतादिन दुबळ्या समाजाला आधार देणारी त्राता आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदरी असल्याचे मत देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले समता पुरस्कार‘ आज देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांना समता भूमी पुणे येथे प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले कीखासदार शरद पवार यांनी आपल्या कामातून महात्मा जोतीराव फुले यांचा वैचारिक वारसा विकसित केलेला असल्याने त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना समता पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. तसेच महात्मा फुले वाडा हा उर्जाकेंद्र असल्याची भावना यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News

यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटीलडॉ.देविसिंग शेखावत,बिहारचे खासदार रामकुमार सरमाखा वंदना चव्हाणमाजी खासदार समीर भुजबळअंकुश काकडेआ.पंकज भुजबळ,  समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळेबापू भुजबळपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक,, तुकाराम अभंगशिवाजीराव नलावडेदीप्ती चौधरीदिलीप खैरेजयवंतराव जाधव,बाळासाहेब कर्डक,  यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News

यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुढे म्हणाल्या की,  महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी छगन भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना केली आहे आणि तीजे विधायक काम हाती घेतले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून या कार्यक्रमासाठी सहभागी होता आले त्याबद्दल आनंद झाला असल्याचे त्यांनी प्रथमतः सांगितले. त्या म्हणाल्या कीमहात्मा फुले यांनी महिलांचा सन्मान केला. त्यांना समाजात महत्वाचे स्थान निर्माण करून दिले आहे. ते सामाजिक समतेचे पुजारी होते. पुरुष आणि स्त्री मध्ये समानता निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केले. मागासवर्गीय सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी केलेले सामाजिक काम हे डोळे दिपून टाकणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्या म्हणाल्या कीमहात्मा फुले यांनी राजकारण समाजकारणशेती,पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राचा गाढा अभ्यास केला. त्यातून त्यांनी सामाजात वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यातून नावसमाज निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून त्यांनी कायद्याचे राज्य निर्माण केले. त्यांचे समतेचे विचार शरद पवार यांनी जोपासले. पुढे देशाच्या शेतीला जगाशी जोडण्याचे प्रयत्न पवार यांनी केला. पवार हे एक व्हिजन असलेले नेतृत्व असून आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा पवारांच्या उल्लेखशिवाय तो पूर्ण होणार नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले.NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News

त्या म्हणाल्या की,  सूर्याची किरणे मातीच्या ढेकळावर पडले तर ते परावर्तित होत नाही मात्र काचेवर पडले तर ते परावर्तित होतात. त्याप्रमाणे छगन भुजबळ हे महात्मा फुले यांचे समतेचे विचार परावर्तित करत असून समता परिषदेच्या माध्यमातून जे विधायक काम त्यांनी सुरू केले आहे ते अविरतपणे सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेपळी खासदार शरद पवार म्हणाले की,  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून सन्मानित करण्यात आला त्याबद्दल प्रथमतः आभार व्यक्त केले.  ते म्हणाले कीशिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. समाजाचा विरोध झुगारून त्यांनी प्रथम सावित्रीबाई फुले याना शिक्षित केले आणि पुढे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.महात्मा फुले हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते. गुलामगिरी पुस्तकातून शेतकरी वर्ग आणि राज्यकर्त्याना दिशा देण्याचे काम केले.NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News

आधुनिकता आणि विज्ञान यांचा पुरस्कार महात्मा फुले यांनी केला. मात्र त्यांचे विचार स्वीकारण्यात वेळ लागला त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की ,शेती क्षेत्रात संकरित बियाणे निर्माण करण्याचा तसेच दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी संकरित जाती निर्माण करण्याचा विचार महात्मा फुले यांनी विचार १५० वर्षापूर्वी मांडला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे समाजाला दिशा देणारे हे जोडपे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की महात्मा फुले यांनी समतेचे विचार समाजाला दिले आहे. मात्र सद्या देशात प्रतिगामी विचारांचा पुरस्कार केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की,  मनुवाद संपवायचा असेल तर सर्वांनी फुलेंचे विचार जोपासायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले कीखासदार शरद पवार यांनी आपल्या कामातून महात्मा जोतीराव फुले यांचा वैचारिक वारसा विकसित केलेला असल्याने त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना समता पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा खासदार शरदचंद्र पवार यांना माता-पित्यांकडून मिळाला आहे. पुढे राज्यकर्ता म्हणून ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्या-त्या वेळी त्यांनी समतेच्या मार्गावर जावून दलित,आदिवासी,अल्पसंख्याकओबीसी  यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मंडल आयोगमराठावाडा विद्यापीठ नामांतरमहिला धोरण यांसारख्या महत्वाच्या निर्णयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील शेतकरीकष्टकरी कामगारअल्पसंख्यांक आणि दिन-दलितांसाठी त्यांनी आपले उभे आयुष्य त्यांनी वेचले. आरक्षणाची अंमलबजावणी करणारे शरद पवार हे देशातील दुसरे राज्यकर्ते आहे अशा शब्दात त्यांनी पवार गौरव त्यांनी केला.

ते म्हणाले की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले स्मारकाच्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ते सोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार ने हजारो कोटी नव्हे तर काही लाख रुपये उपलब्ध करून दिले तर स्मारकाचा प्रश्न सुटू शकतो असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले कीहे स्मारक आमच्यासाठी ऊर्जा केंद्र. वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा या ठिकानातून मिळते. मात्र गेली दोन वर्षे या मातीत अभिवादन सोहळ्यास उपस्थित राहू शकलो नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

ते म्हणाले कीमहात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी विज्ञानाचा पुरस्कार केला. शरद पवार यांनी त्यांचे विचार जोपासून विज्ञानाचा पुरस्कार केला आहे. मात्र मनुवादी लोकांकडून मनुस्मृतीचा पुरस्कार केला जात आहे. देशात संविधान जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे मनुवाद संपविण्यासाठी एकत्रित लढा द्यावा लागेल. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजशाहू,फुलेआंबेडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन करून त्यांचे विचार समाजात रुजविले तर मनुवादी विचार नष्ट होतील असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाला आमचा सपोर्ट आहे मात्र इतर आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिहारचे खासदार रामकुमार शर्मा म्हणाले कीमहात्मा फुले यांचे विचार देशभरात पोहचविण्याचे काम देशात पोहचविण्याचे छगन भुजबळ यांनी केले आहे. आपण देखील त्यांचे विचार देशभरात पोहचविण्याचे काम पुण्यतिथीने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महापौर मुक्ता टिळक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णकांत कुदळे यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार लडकत तर आभार प्रदर्शन प्रितेश गवळी यांनी केले.

NCP Chief Sharad Pawar Felicitated Mahatma Fule Samata Award 2018 Chhagan Bhujbal Pune Nashik News
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.